Major disaster averted : मोठा विमान अपघात टळला, एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाईन्सच्या विमानाची टक्कर टळली

Air India and Nepal Airlines Planes Almost Collided, 3 Controllers Suspended : एक मोठा विमान अपघात टळला आहे. एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाईन्स या दोन कंपन्यांच्या प्रवासी विमानांची टक्कर टळली.

Major disaster averted
मोठा विमान अपघात टळला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मोठा विमान अपघात टळला
  • एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाईन्सच्या विमानाची टक्कर टळली
  • नेपाळमध्ये घडली घटना, चौकशीचे आदेश

Air India and Nepal Airlines Planes Almost Collided, 3 Controllers Suspended : एक मोठा विमान अपघात टळला आहे. एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाईन्स या दोन कंपन्यांच्या प्रवासी विमानांची टक्कर टळली. ही घटना नेपाळची राजधानी काठमांडूच्या आकाशात घडली. या प्रकरणी काठमांडू येथील त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टच्या (त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ) नियंत्रण कक्षातील तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.

काठमांडू येथील त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टच्या (त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ) नियंत्रण कक्षातून विमानांना मार्गदर्शन सुरू होते. नियमानुसार एअर ट्रॅफिक कंट्रोलमधून येणाऱ्या सूचनांचे वैमानिक पालन करत होते. क्वालालंपुर येथून नेपाळ एअरलाईन्सचे एअरबस ए 320 हे विमान येत होते. तर दिल्लीहून एअर इंडियाचे विमान येत होते. दोन्ही विमानांना काठमांडूच्या त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरायचे होते. 

एअर इंडियाचे विमान 19 हजार फूट उंचीवर होते तर नेपाळ एअरलाईन्सचे विमान 15 हजार फूट उंचीवर होते. एअर ट्रॅफिक कंट्रोलने एअर इंडियाच्या विमानाला उंचावरून खाली येण्यासाठी सूचना देण्यास सुरुवात केली. या सूचनांचे पालन करताना एअर इंडियाच्या नेपाळ एअरलाईन्सचे विमान आपल्या मार्गात येत असल्याचे दिसले. यानंतर नेपाळ एअरलाईन्सच्या वैमानिकाने तातडीने विमान एकदम 7 हजार फूट उंचीवर आणले. या सर्व घडामोडी प्रचंड वेगाने अल्पावधीत घडल्या. थोडी दिरंगाई झाली असती तर दोन्ही विमानांची एकमेकांना धडक बसून मोठा अपघात झाला असता. 

नियंत्रण कक्षाच्या सूचनांमुळे निर्माण झालेले संकट वैमानिकांनी प्रसंगावधान राखल्यामुळे टळले. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटी ऑफ नेपाळने (Civil Aviation Authority of Nepal : CAAN) नियंत्रण कक्षातील तीन अधिकाऱ्यांचे निलंबन केले. तसेच या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले. 

नवा AC खरेदी करण्याआधी हे वाचा

या शहरांमध्ये एन्जॉय करा नाइटलाइफ

विमान वाहतुकीच्या नियमांनुसार कोणत्याही दोन विमानांमध्ये सुरक्षित अंतर असणे आवश्यक आहे. हे अंतर ठेवले नाही तर विमानांची थेट धडक होण्याचा अथवा एका विमानाच्या उड्डाणामुळे हवेत निर्माण झालेल्या कंपनांनी दुसऱ्या विमानाला अपाय होण्याचा धोका असतो. दोन विमानांमध्ये कमी अंतर असेल तर हवेतील कंपनांचा फटका एका विमानाला बसतो आणि त्या विमानाला अपाय झाल्यामुळे दुसऱ्या विमानालाही फटका बसण्याचा धोका असतो. पण नियंत्रण कक्षाकडून या साध्या पण महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे संकट निर्माण झाले होते. नेपाळ एअरलाईनच्या वैमानिकाने विमान तातडीने कमी उंचीवर नेल्यामुळे पुढचे संकट टळले. मोठी जीवितहानी टळली.

जन्मल्यापासून या चिमुकलीची जगभर चर्चा

बॉलिवूडच्या अभिनेत्यांपेक्षा जास्त स्मार्ट आहेत यूट्युबर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी