Air India flight drunk man pees on woman passenger: एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका पुरुष प्रवाशाने अत्यंत घृणास्पद असे कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. विमानातून प्रवास करत असताना दारूच्या नशेत असलेल्या पुरुष प्रवाशाने विमानातील महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केली आहे. न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ही घटना घडली आहे. पीडित महिला बिझनेस क्लासमधून प्रवास करत असताना हा प्रकार घडला. या प्रकरणानंतर पीडित महिलेने विमानातील क्रू मेंबर्सकडे याबाबत तक्रात सुद्धा केली. (Air India drunk passenger urinate on female passenger in new york delhi flight shocking incident complaint lodged read in marathi)
पीडित महिलेने सांगितले की, ही घटना 26 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या AI-102 या विमानात घडली होती. स्थानिक वेळेनुसार, एअर इंडियाची फ्लाईटने दुपारी जवळपास एक वाजण्याच्या सुमारास न्यूयॉर्कहून उड्डाण केले. दुपारी लंच झाल्यावर तात्काळ लाईट्स बंद करण्यात आले. त्यावेळी दारूच्या नशेत असलेला एक पुरुष प्रवासी माझ्या सीटजवळ आला. त्यानंतर त्याने आपल्या पँटची चैन उघडली आणि मला गुप्तांग दाखवू लागला.
#AirIndia has lodged a police complaint against an inebriated male passenger who urinated on a female co-passenger in Air India's flight. — Mirror Now (@MirrorNow) January 4, 2023
The victim claims she received no help from crew when the incident took place. @Aruneel_S reports pic.twitter.com/8YqTErj0RZ
हे पण वाचा : हिवाळ्यात पुरुषांनी करा हे काम त्वचा होईल मुलायम
पीडित महिलेने सांगितले की, दारूच्या नशेत असलेल्या या पुरुष प्रवाशाने लघवी केली आणि त्यानंतरही तो तेथेच उभा होता. त्यानंतर एका दुसऱ्या प्रवाशाने त्याला जाण्यास सांगितले तेव्हा हा व्यक्ती तेथून निघून गेला. दारूच्या नशेत असलेला हा व्यक्ती तेथून निघून गेल्यावर पीडित महिलेने या घटनेची माहिती तात्काळ केबिन क्रू मेंबर्सला दिली.
हे पण वाचा : जास्त लिप बाम लावू नका अन्यथा...
पीडित महिलेने सांगितले की, दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने केलेल्या लघवीमुळे माझे कपडे, शूज आणि बॅग पूर्ण खराब झाले होते. विमानातील क्रू मेंबर्सने या सर्व वस्तूंवर जंतुनाशकाची फवारणी केली. तर महिला प्रवाशाने एअरलाईन्सच्या टॉयलेटमध्ये स्वत:चे कपडे साफ केले त्यानंतर क्रू मेंबर्सने पीडित महिलेला काही कपडे आणि डिस्पोजेबल चप्पलचा एक सेट दिला.
हे पण वाचा : मकरसंक्रातीला बनतोय खास योग, या राशीच्या व्यक्तींना होणार मोठा लाभ
पीडित महिलेला त्या गलिच्छ जागेवर पुन्हा परतायचं नव्हतं आणि त्यामुळे ती टॉयलेटच्या शेजारीच उभी होती. जवळपास 20 मिनिटे ही महिला टॉयलेटच्या शेजारी उभी होती पण आपल्या जागेवर परतली नाही. त्यानंतर क्रू मेंबर्सने या महिलेला त्यांची एक सीट उपलब्ध करुन दिली. तर विमानातील स्टाफने गलिच्छ झालेल्या जागेवर साफसफाई करुन तेथे एक बेडशीट टाकली. मात्र, तरीही त्या जागेवर लघवीचा उग्र वास येत होता.