आता Air India च्या विमानात तांत्रिक बिघाड, मुंबईत सुरक्षीत लँडींग

Air India Flight: डीजीसीएने सांगितले की पायलटने "प्रेशर ड्रॉप" नोंदवल्यानंतर एअर इंडियाचे ड्रीमलाइनर विमान मुंबईकडे वळवण्यात आले. याआधी बुधवारी दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या गो फर्स्ट विमानाच्या विंडशील्डला तडा गेला होता.

Air India Flight: Now Air India plane has technical fault, flight diverted due to low pressure, 258 passengers were on board
आता Air India च्या विमानात तांत्रिक बिघाड, मुंबईत सुरक्षीत लँडींग ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड
  • विमान मुंबईकडे वळवण्यात आले.

मुंबई : फ्लाइटमधील तांत्रिक अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. गुरुवारी एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे विमान वळवावे लागले. DGCA नुसार, दुबईहून कोचीला येत असलेल्या एअर इंडियाच्या बोईंग फ्लीट B787, फ्लाइट क्रमांक AI-934 (दुबई-कोची) मध्ये तांत्रिक बिघाड झाला. या उड्डाणावर कमी दाबाची नोंद झाली. यानंतर विमान मुंबईकडे वळवण्यात आले. विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरले आहे. या घटनेच्या प्राथमिक चौकशीचे काम दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. (Air India Flight: Now Air India plane has technical fault, flight diverted due to low pressure, 258 passengers were on board)

अधिक वाचा : 'थरकाप' उडवणारा प्रसंग ... ! गरोदर महिलेला डंपरने चिरडले, जखमी बापाच्या डोळ्यासमोर रस्त्यावरच चिमुरडीचा जन्म

विमानात 258 प्रवासी 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या फ्लाइटमध्ये 258 प्रवासी होते. पायलटने "दबाव कमी झाल्याचा" अहवाल दिल्यानंतर एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान मुंबईकडे वळवण्यात आल्याचे डीजीसीएने सांगितले. केबिनमध्ये दबाव नसणे हा फ्लाइट सुरक्षेचा गंभीर धोका आहे.

गो फर्स्ट विमानाच्या विंड शील्डला तडा 

बुधवारी दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या गो फर्स्ट विमानाच्या विंडशील्डला तडा गेला. गो फर्स्ट फ्लाइट G8-151 हे रात्री 12.40 वाजता दिल्लीहून निघाले होते. काही वेळाने वैमानिकांना कळले की विंड शील्डला तडा गेला आहे. यानंतर विमान पुन्हा दिल्लीला नेण्यात आले. मात्र मुसळधार पावसामुळे दिल्लीत हवामान खराब झाले होते. त्यामुळे विमान दिल्लीत उतरू शकले नाही. त्यानंतर विमान जयपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

अधिक वाचा : Sidhu Moose Wala: 'पुढचा नंबर तुमचा' सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना पाकिस्तानी नंबरवरुन धमकीचा मेसेज

गेल्या महिनाभरात अनेक प्रकरणे 

गेल्या एका महिन्यात भारतीय विमान कंपन्यांच्या उड्डाणांमध्ये तांत्रिक बिघाडाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही सुरक्षित हवाई प्रवास सुनिश्चित करण्याच्या मुद्द्यावर एअरलाइन्स, त्यांच्या मंत्रालयाचे अधिकारी आणि DGCA अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. डीजीसीएने सोमवारी सांगितले की त्यांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. उड्डाण करण्यापूर्वी विविध कंपन्यांचे विमान प्रमाणित करणाऱ्या अभियंत्यांची संख्या अपुरी असल्याचे आढळून आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी