Ajit Doval: दहशतवाद विचारसरणी नष्ट केली पाहिजेः अजित डोभाल

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आज दिल्लीच्या NIAच्या एका कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी दहशतवाद्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं. दहशतवाद नष्ट करायला पाहिजे असं डोभाल यांनी म्हटलं आहे.

Ajit Doval
Ajit Doval: दहशतवाद विचारसरणी नष्ट केली पाहिजेः अजित डोवाल   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल (Ajit Doval)यांनी सोमवारी एनआयएच्या एका कार्यक्रमाला संबोधित केलं.
  • अजित डोभाल यांनी पाकिस्तानचं नाव घेत म्हटलं की, जर एखाद्या देशानं कोणत्याही गुन्हेगाराचं समर्थन केलं तर ते एक मोठे आव्हान आहे.
  • दिल्लीत दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखांच्या / स्पेशल टास्क फोर्सच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना डोभाल यांनी एनआयएचे कौतुक केले.

नवी दिल्लीः राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल (Ajit Doval)यांनी सोमवारी एनआयएच्या एका कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी अजित डोभाल यांनी पाकिस्तानचं नाव घेत म्हटलं की, जर एखाद्या देशानं कोणत्याही गुन्हेगाराचं समर्थन केलं तर ते एक मोठे आव्हान आहे. काही देशांनी तर यावर प्रभुत्व मिळवलं आहे. आपल्या बाबतीत पाकिस्ताननं आपल्या देशाच्या धोरणाचा हा एक भाग बनविला आहे. 

दिल्लीत दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखांच्या / स्पेशल टास्क फोर्सच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना डोभाल यांनी एनआयएचे कौतुक केले. एनआयएने काश्मीरमधील दहशतवादाविरोधात जी कामे केली आहेत ती इतर कोणत्याही एजन्सीच्या तुलनेत कौतुकास्पद कार्य असल्याचं डोभाल यांनी म्हटलं. पुढे ते सांगतात की, फायनाशियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) च्या कारवाईमुळे पाकिस्तानवर सर्वांत मोठा दबाब कायम आहे. या कारवाईमुळे त्यांच्यावर दबाव आणला आहे जो कदाचित इतर कोणत्याही कारवाईमुळे निर्माण करू शकला नसता. 

आपल्याला दहशतवादाविरोधात लढायला हवं. दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई करून हे फार महत्वाचे ठरले आहे की त्यांचा खात्मा केला जाईल. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी सर्वांत पहिलं या गोष्टींची माहिती मिळवणं गरजेचं आहे की, त्यांच्या मागे कोणाचा हात आहे जो मदत करत आहे. त्यानंतर त्यांची फंडिंग आणि हत्यारं थांबवणं गरजेचं आहे आणि त्यांचे प्रशिक्षण केंद्र नष्ट करणं. आपल्याला दहशतवादाची विचारसरणी संपवण्याची गरज आहे जी एनआयएचा पुढचं लक्ष्य असावं. 

याआधी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी ( NIA) नं फुटीरतावाद्यांना फंडिग करण्याबाबत एक मोठा खुलासा करत डोभाल यांनी म्हटलं की, ही फंडिंग पाकिस्तानी उच्च आयोगाद्वारे होत होती. एनआयएचे महासंचालक आलोक मित्तल यांनी सांगितलं की, पंजाबमधील दहशतवादी कारवायांना पुन्हा जिवंत करण्यासाठी सीमेपलीकडून सतत प्रयत्न केले जात असल्याचं दलानं सांगितलं. 16 लोकांना 8 प्रकरणात लक्षित हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे आणि यात खालिस्तान लिबरेशन फोर्स देखील सहभागी होती. यासाठी ब्रिटन, इटली, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाकडून फंड पाठवण्यात आलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी