शरद पवारांसमोरच हाय वोल्टेज ड्रामा; सभागृह सोडून अजितदादा थेट बाहेर पडले, दादांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?

Ajit Pawar news: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात एक नाराजी नाट्य पहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नाराज झाले आणि थेट सभागृहातून बाहेर पडल्याचं वृत्त समोर आलं. यावर आता अजितदादांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Ajit pawar upset high voltage drama in front of sharad pawar during ncp national convention
शरद पवारांसमोरच हाय वोल्टेज ड्रामा; सभागृह सोडून अजितदादा थेट बाहेर पडले, दादांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?   |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन
  • राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवारांसमोर नाराजी नाट्य
  • अजित पवार नाराज असल्याची जोरदार चर्चा

Ajit Pawar upset: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठव्या राष्ट्रीय अधिवेशनात (ncp national convention) नाराजी नाट्य पहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रसेचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. कारण, कार्यक्रम सुरू असतानाच अजित पवार हे व्यासपीठावरुन तडकाफडकी निघून गेले. त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोरच हा सर्व प्रकार घडला आणि मीडियाच्या कॅमेऱ्यातही हे सर्व दृश्य कैद झाली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिवेशन दिल्लीत सुरू आहे. या अधिवेशनात सर्व नेत्यांची भाषणे सुरू होती. मात्र, अजित पवार यांनी भाषण न करताच ते तडकाफडकी व्यासपीठावरुन निघून गेले. जयंत पाटील यांना आपल्यापूर्वी बोलण्याची संधी दिल्याने अजित पवार नाराज होऊन निघून गेल्याची चर्चा समोर आली. विशेष म्हणजे अजित पवार हे व्यासपीठावरुन निघून जात असताना प्रफुल्ल पटेल यांनी माईकवरुन अजित पवारांना थांबण्याची विनंती केल्याचंही दिसून आलं. मात्र, अजित पवार आलेच नाहीत.

हे पण वाचा : प्रियंका चोपडाने केले 7 धक्कादायक खुलासे​

नेमकं काय घडलं? 

राष्ट्रीय अधिवेशनात सर्व नेते भाषण करत होते. जयंत पाटील यांनीही भाषण केलं आणि त्यानंतर अजित पवारांचं भाषण होतं. त्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी व्यासपीठावरुन जाहीर सुद्धा केलं की, आता पवार साहेबांच्या आधी शेवटचं पाभषण अजित पवारांचं...  मात्र, अजितदादा तेथून निघून गेले. यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले बोलवू आपण त्यांना... पवार साहेबांचे भाषण होण्यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेस यांच्या नवीन झेंड्याचं अनावरण करूया.

अजित पवार काय म्हणाले?

या नाराजी नाट्यावर अजित पवारांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, हे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन नव्हतं. हे राष्ट्रीय अधिवेशन आहे. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांनी आपआपली मते मांडली. त्यामुळे हे सर्व विषय आल्याने मी त्यात भाषण केलं नाही. मी काही बोललो नाही ही वस्तूस्थिती खरी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी