Ajmer : नुपुर शर्मा विषयी चिथावणी देणारे वक्तव्य केले, अजमेर दर्ग्याच्या खादिम सलमान चिश्तीला अटक

Ajmer Police arrests Khadim of Ajmer Dargah for provocative statement against Nupur Sharma : भारतीय जनता पार्टीमधून (भाजप) निलंबित करण्यात आलेल्या नुपुर शर्मा यांच्याविषयी चिथावणी देणारे वक्तव्य केल्याप्रकरणी अजमेर दर्ग्याच्या खादिम सलमान चिश्ती याला पोलिसांनी अटक केली.

Ajmer Police arrests Khadim of Ajmer Dargah for provocative statement against Nupur Sharma
अजमेर दर्ग्याच्या खादिम सलमान चिश्तीला अटक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अजमेर दर्ग्याच्या खादिम सलमान चिश्तीला अटक
  • चिश्तीने नुपुर शर्मा विषयी चिथावणी देणारे वक्तव्य केले होते
  • उमेश कोल्हे आणि कन्हैय्यालालच्या हत्यांचा तपास NIAकडे

Ajmer Police arrests Khadim of Ajmer Dargah for provocative statement against Nupur Sharma : भारतीय जनता पार्टीमधून (भाजप) निलंबित करण्यात आलेल्या नुपुर शर्मा यांच्याविषयी चिथावणी देणारे वक्तव्य केल्याप्रकरणी अजमेर दर्ग्याच्या खादिम सलमान चिश्ती याला पोलिसांनी अटक केली. अजमेर पोलिसांनी मंगळवार ५ जुलै २०२२ रोजी ही कारवाई केली. चिश्तीने केलेल्या एका व्हिडीओत नुपुर शर्माचा शिरच्छेद करणाऱ्याला स्वतःचे घर ईनाम म्हणून देणार असे जाहीर केले होते. खादिम सलमान चिश्ती याचा व्हिडीओ कन्हैय्यालालचे मारेकरी रियाज मोहम्मद आणि गौस मोहम्मद यांच्या व्हिडीओशी साधर्म्य साधणारा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळले आहे. तीन मिनिटांच्या व्हिडीओत खादिम सलमान चिश्ती धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत जाहीरपणे नुपुर शर्माचा शिरच्छेद करण्यास सांगत असल्याचे दिसते.

Documentary Poster Issue : माझ्यासाठी काली माँ मांसाहार आणि मद्यप्राशन करणारी देवी, तृणमूल खासदार महुआ मोईत्रांंचं विधान, पक्षाकडून कानावर हात

हिस्ट्रीशीटर सलमान चिश्ती

सलमान चिश्ती एक हिस्ट्रीशीटर आहे. चिश्ती विरोधात पोलिसांनी आधीच १३ तक्रारी नोंदविल्या आहेत. नुपुर शर्मा प्रकरणात आलेल्या व्हिडीओनंतर चिश्तीविरोधात पोलिसांनी नवी तक्रार नोंदविली. तक्रार दाखल होताच चिश्ती फरार झाला होता. 

'मी माझ्या जन्मदात्या आईची शपथ घेतो, मी तिला गोळी मारली असती. मी आपल्या मुलांची शपथ घेतो, मी तिला आजही गोळी मारू शकतो. जो कोणी नुपुर शर्माचा शिरच्छेद करेल त्याला मी माझे घर ईनाम देईन. मी वचन देतो' अशा स्वरुपाची वक्तव्ये सलमान चिश्तीने केली. 

व्हिडीओत नशेत दिसला चिश्ती : पोलीस

चिश्तीचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. अजमेर पोलीस दलाच्या एएसपी विकास सांगवान यांनी व्हिडीओ प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. व्हिडीओत चिश्ती नशेत दिसत होता; अशी माहिती पोलिसांनी दिली. 

दोन जणांची हत्या

नुपुर शर्मा यांना पाठिंबा दर्शविणारा वा त्यांचे समर्थन करणारा अशा स्वरुपाचा संदेश सोशल मीडियात फॉरवर्ड वा शेअर केला म्हणून भारतात आतापर्यंत दोन जणांची हत्या झाली. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात फार्मासिस्ट उमेश कोल्हे आणि राजस्थानात उदयपूरमध्ये कन्हैय्यालालची हत्या झाली. दोन्ही हत्या धारदार सुऱ्याने गळा चिरून करण्यात आल्या होत्या. या दोन प्रकरणांचा तपास सध्या एनआयए करत आहे. हा तपास सुरू असतानाच अजमेर पोलिसांनी  खादिम सलमान चिश्ती याला अटक केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी