AK 94 Rifle and it’s power | AK-47 पेक्षाही खतरनाक रायफल, एका दणक्यात सोडते दोन गोळ्या, स्पीड वाचून बसेल शॉक, मुसेवालाची हत्या याच रायफलने

एकाच वेळी दोन गोळ्या फायर करणारी रशियन बनावटीची ही रायफल सिद्धू मुसेवालाचा जीव घेण्यास कारणीभूत ठरली. या रायफलीची रचनाच अशी आहे की तिच्या हल्ल्यातून वाचणं जवळपास अशक्य आहे.

AK 94 Rifle and it’s power
AK 47 पेक्षाही खतरनाक रायफल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • AK 94 ने घेतला सिद्धू मुसेवालाचा बळी
  • एका वेळी फायर होतात दोन गोळ्या
  • AK 47 पेक्षा अनेक बाबतीत खतरनाक

AK 94 Rifle and it’s power : सिद्धू मूसेवालाचा (Siddhu Moosewala) खून (Murder) करण्यासाठी AK 94 रायफलचा (Rifle) वापर करण्यात आल्याचं सिद्ध झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ एक नव्हे तर तब्बल तीन AK 94 रायफल्सचा वापर करून मुसेवालाची हत्या करण्यात आली. मूसेवालाच्या शरीरात झडनभरापेक्षाही जास्त गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, अशी माहिती त्याचं पोस्टमॉर्टेम करणाऱ्या 5 डॉक्टरांनी दिली होती. 

असा केला गोळीबार

हल्लेखोरांनी सिद्धू मूसेवालावर अंदाधुंद फायरिंग केलं. त्याच्यावर सलग 30 राऊंड फायर करण्यात आले. काही मिनिटांत फायरिंग करून हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले होते. वास्तविक मुसेवालाच्या सुरक्षारक्षकांकडेही AK 47 रायफल होती. त्यामुळे मुसेवाला एकटा सापडेपर्यंत हल्लेखोर त्याच्यावर दबा धरून बसले होते. शिवाय AK47 पेक्षाही खतरनाक असणाऱ्या AK 94 रायफल्सचा वापर करून त्यांनी मुसेवालाचा जीव घेतला. 

AK 94 जास्त खतरनाक

या रायफलचं एकमेव वैशिष्ट्यं तिला इतरांपेक्षा अधिक शक्तीशाली बनवतं. ट्रिगर दाबल्यानंतर बर्स्ट फायर करताना या रायफलीतून एकाच वेळी दोन गोळ्या बाहेर पडतात. त्यामुळे ज्याच्यावर या गोळ्या झाडल्या जातील, ती व्यक्ती वाचणं फारच दुर्मिळ असतं. मुसेवालावर याच जीवघेण्या रायफलीतून हल्ला झाल्यामुळे तो वाचणं जवळपास अशक्य होतं. 

AK 94 ची वैशिष्ट्ये

AK 94 ही रशियन बनावटीची ॲव्तोमॅट निकोनोव्हा (Avtomat Nikonova) जातीची रायफल आहे. 1994 साली हे मॉडेल रशियानं बाजारात आणल्यामुळे तिला AK 94 हे नाव देण्यात आलं. गेनाडी निकोनोव्हा असं या रायफलीच्या निर्मात्याचं नाव. रशियातील पहिली निकोनोव्ह मशीन गन यांनीच तयार केली होती. AK 74 या रायफलीत काही बदल करून AK 94 ही रायफल निकोनोव्हा यांनी तयार केली. 

एका मिनिटात 600 राउंड

AK 94 ला ऑटोमॅटिक मोडवर टाकल्यानंतर ही रायफल 900 मीटर प्रति सेकंद या वेगाने एका मिनिटांत 600 राऊंड फायर करू शकते. 700 मीटरची फायरिंग रेंज असणाऱ्या या रायफलीत ‘बर्स्ट मोड’ नावाचा एक पर्याय आहे. हा पर्याय निवडला तर या रायफलीतून एकाच वेळी 1800 गोळ्या झाडता येतात. या रायफलीत 30 ते 45 गोळ्या असणारी मॅगेझिन्स भरली जातात. 60 राऊंड फायर करणारी मॅगेझीन्सही यात भरता येतात. AK 94 चं वजन आहे 3 किलो 850 ग्रॅम आणि लांबी आहे 943 मिलीमीटर. 

AK 47 पेक्षा काय वेगळं?

AK 47 पेक्षा AK 94 रायफलीतला मुख्य फरक म्हणजे फायरिंग करण्याची क्षमता. एकाच वेळी या बंदुकीतून दोन गोळ्या सुटतात. शिवाय या रायफलीतून सुटणाऱ्या गोळ्यांचा वेग हा AK47 पेक्षा जास्त असतो. AK 47 मधून सुटणारी गोळी ही 715 मीटर प्रतिसेकंद वेगाने जाते, तर AK 94 मधून सुटणाऱ्या गोळीचा वेग असतो 900 मीटर प्रति सेकंद. AK 47 रायफलीची रेंज आहे 350 मीटर, तर AK 94 ची रेंज आहे 700 मीटर. म्हणजे तब्बल दुप्पट. शिवाय AK47 च्या तुलनेत ही बंदूक वजनाने 1 किलो हलकी असते. मात्र AK 47 च्या तुलनेत याचा मेेेंटेनन्स जास्त असल्यामुळे रशियन सैन्यानं आता ही बंदूक वापरणं बंद केलं आहे. 

पाकिस्तानमधून गँगस्टर्सना पुरवठा

रशियन बनावटीच्या या रायफलीची तस्करी पाकिस्तानमधून होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ड्रोनच्या मार्फत या रायफली भारतात आणल्या जातात आणि इथल्या गँगस्टर्सना पुरवल्या जात असल्याचं दिसून आलं आहे. या रायफली शोधून त्या जप्त करणं हे पंजाब पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. मुसेवालाच्या हत्येनंतर या बंदुकांचा सुळसुळाट झाल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी