sexual abuse : जयपूरचं 'आश्रम', दारू पार्टी अन् 8 मुलांचे लैंगिक शोषण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला आली जाग

8 children sexual abuse :  आश्रम (Shelter house) म्हटलं की आपल्याल वेबसिरिज आठवते, तेथील प्रकार पाहून आपण चक्रावून जातो. असाच एका आश्रमाविषयीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात लहान मुलांचे लैंगिक शोषण (Sexual abuse) केलं जात असल्याचं उघड झालं आहे.

Alcohol party in Jaipur's 'Ashram' and sexual abuse of 8 children
जयपूरच्या 'आश्रम' मध्ये 8 मुलांचे लैंगिक शोषण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आश्रममध्ये जयपूर, भरतपूर अजमेर, दौसा आणि इतर परिसरातील 19 लहान मुले राहत.
  • लैंगिक शोषणाच्या तक्रारीचा ऑडिओ बाल आयोगाकडे पोहोचताच प्रकरणाचा तपास सुरू.
  • 16 ते 17 वर्षाचे मुले 8 ते 10 वर्षाच्या मुलांचे शोषण करत असल्याच सांगण्यात येत आहे.

8 children sexual abuse :  जयपूर:  आश्रम (Shelter house) म्हटलं की आपल्याल वेबसिरिज आठवते, तेथील प्रकार पाहून आपण चक्रावून जातो. असाच एका आश्रमाविषयीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात लहान मुलांचे लैंगिक शोषण (Sexual abuse) केलं जात असल्याचं उघड झालं आहे. हा आश्रम जयपूरमधील (Jaipur) आहे. यात जयपूर, भरतपूर अजमेर, दौसा आणि इतर परिसरात असलेल्या जिल्ह्यातील 19 मुले राहत आहेत. या लैंगिक शोषणाच्या तक्रारीचा ऑडिओ बाल आयोगाकडे (Juvenile Commission) पोहोचताच अधिकाऱ्यांची धांदल उडाली आणि कारवाईला सुरुवात झाली. जयपूर येथील चाइल्डलाइन समुपदेशक (Childline Counselor) शांती बेरवाल (Shanti Berwal) यांनी बुधवारी रात्री उशिरा अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर (FIR)  दाखल केला आहे.

संचालकाला अटक झाली 

गुरुवारी पोलिसांनी आश्रमाचा संचालक आणि काही संशयितांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पोलीस चौकशी करत आहेत. गुरुवारी तेथे राहणाऱ्या मुलांना अन्य ठिकाणी हलवण्यात आले.

अल्पवयीन मुलांकडून 8 ते 10 वर्षाच्या मुलांचे लैंगिक शोषण

समुपदेशक शांती बेरवाल यांच्या म्हणण्यानुसार, आश्रमात उपस्थित मुलांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांच्या वेदना ऐकून त्यांना धक्का बसला. त्यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी एक 16 वर्षीय मुलगा आश्रमात आला होता.  या अल्पवयीन मुलाने आश्रमातील मुलांसोबत विनयभंग व घाणेरडे कृत्य करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याच मुलाचे आणखी दोन साथीदार आश्रमात आले.  त्यांचे वयही सुमारे 16 ते 17 वर्षे आहे. हे तिघेही आश्रमात राहणाऱ्या 8 ते 10 वर्षांच्या मुलांसोबत घाणेरडे कृत्य करायचे.  लहान मुलांना धमकावून ते गप्प बसवत आणि त्यांचा व्हिडीओही त्यांनी बनवला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याची पडताळणी केली जात आहे.

तिथे रोज व्हायची दारूची पार्टी

आश्रमात रोज दारूची पार्टी होत असे. धनत्रयोदशीच्या रात्रीही आश्रमात दारूची पार्टी होती. दारु पिवून हे अल्पवयीन आरोपी धिंगाणा घालत होते. दरम्यान, आश्रमात राहणाऱ्या एका तरुणाने मोबाईलवरून दारू पार्टीचा व्हिडिओ बनवला. हाच व्हिडिओ बाल आयोगाच्या एका कर्मचाऱ्याला मोबाईलवर पाठवण्यात आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी