खासगी जेट विमानांमध्ये होतात सर्व 'नको ते प्रकार', हवाईसुंदरीने फोडले अब्जाधिश आणि नेत्यांचे बिंग

सास्किया स्वान या हवाई सुंदरीने पहिली नोकरी रशियाच्या एका कोट्याधीशाच्या खासगी जेटमध्ये केली होती. यावेळी तिला आठ गुप्त कागदपत्रांवर सही करावी लागली होती. उत्तम पगारामुळे ती खुश होती, मात्र हा आनंद मावळला.

Air hostess
खासगी जेट विमानांमध्ये होतात सर्व प्रकारची चुकीची कामे, हवाईसुंदरीने आपल्या पुस्तकात सांगितले सत्य  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • दोन दशकांचा अनुभव हवाई सुंदरीने पुस्तकात मांडला
  • कुणाचेही नाव न घेता कोट्याधीशांची कृत्ये केली उघड
  • रशियाच्या कोट्याधीशाकडे केली होती पहिली नोकरी

जगभरातील (World) अनेक प्रसिद्ध व्यक्ती (famous personalities) अनेकदा खासगी जेट विमानांचा (private jet planes) वापर करतात. ही जेट विमाने हवेत उडत्या महालांपेक्षा (flying castles) कमी नसतात. मात्र आता या जेट विमानांमध्ये घडणाऱ्या घाणेरड्या गोष्टींबद्दलचे (immoral deeds) सत्य (truth) समोर आणले आहे. एका हवाई सुंदरीने (air hostess) आपल्या अनुभवांबद्दल (experiences) एक पुस्तक (book) लिहिले आहे ज्यात तिने या जेट्समध्ये होणाऱ्या वाईट गोष्टींबद्दलचा खुलासा (reveal) केला आहे.

रशियाच्या कोट्याधीशाकडे केली पहिली नोकरी

सास्किया स्वान या हवाई सुंदरीने पहिली नोकरी रशियाच्या एका कोट्याधीशाच्या खासगी जेटमध्ये केली होती. यावेळी तिला आठ गुप्त कागदपत्रांवर सही करावी लागली होती. उत्तम पगारामुळे ती खुश होती, मात्र हा आनंद मावळला. लवकरच तिला कळले की तिच्या बॉसला हवाई सुंदरींसोबत शारीरिक संबंध ठेवायला आवडते तेव्हा ती घाबरली.

खासगी जेट्समध्ये चालतो शरीराचा व्यापार

सास्कियाने लिहिलेल्या पुस्तकात तिने असेही म्हटले आहे की अशा खासगी जेट विमानांमध्ये शरीराचा व्यापार होतो आणि इच्छा नसतानाही त्यांना अनेक चुकीच्या कामांमध्ये सहभागी व्हावे लागते. सास्कियाने या पुस्तकाद्वारे सौदी अरबचा राजकुमार, अमेरिका, ब्रिटिश आणि जर्मनीसारख्या देशांमधल्या कोट्याधीशांबद्दल खुलासे केले आहेत.

स्वैराचाराचा अड्डा आहेत खासगी जेट्स

'द सन'च्या बातमीनुसार सास्किया स्वानने आपल्या दोन दशकांच्या कामाचा अनुभव ‘सीक्रेट ऑफ अ प्राइवेट फ्लाईट अटेंडेंट’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. यात तिने अनेक गुपिते खुली केली आहेत. तिने लिहिले आहे की एकदा जेव्हा ती विमानात आपल्या बॉसच्या केबिनमध्ये पोहोचली तेव्हा तो तिला संग करताना दिसला. तिच्यासाठी हे दृष्य नवे नव्हते, कारण हे तिथे दररोज घडत असे. सास्कियाच्या मते खासगी जेट्स हा स्वैराचाराचा अड्डा आहे. सास्कियाने 6 वर्षे कमर्शियल एअरलाईन्समध्ये काम केले होते. यानंतर ती खासगी विमानांमध्ये काम करू लागली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी