आता मशीद बनवण्यासाठी मंदिर पाडले जाऊ शकते, इमाम संघ अध्यक्षांचे वादग्रस्त विधान

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 06, 2020 | 13:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sajid Rashidi:ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशीदी यांनी भडकवणारे विधान केले आहे. ते म्हणाले असे होऊ शकते की मशीद बनवण्यासाठी मंदिरला पाडले जाऊ शकते. 

Sajid Rashidi
'आता मशीद बनवण्यासाठी मंदिर पाडले जाऊ शकते' 

थोडं पण कामाचं

  • ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशीदीने केले वादग्रस्त विधान
  • रशीदी म्हणाले येणाऱ्या काळात असेही होऊ शकते की मशीद बनवण्यासाठी मंदिर पाडले जाऊ शकते
  • अयोध्येत बुधवारी पंतप्रधान मोदींनी राम मंदिराचे भूमिपूजन आणि शिलान्यास केला. 

नवी दिल्ली: ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशीदी (All India Imam Association President Sajid Rashidi ) यांनी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन तसेच शिलान्यास करण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रशीदी यांनी गुरुवारी सांगितले की इस्लाममध्ये अशी मान्यता आहे की मशीद नेहमी मशीदच राहील. दुसऱ्या एखाद्या गोष्टीच्या निर्मितीसाठी मशीद तोडली जाऊ शकत नाही. ते म्हणाले, आमच्या मान्यतेनुसार बाबरी मशीद तेथे होती आणि तेथे नेहमी मशीदीच्या रुपातच राहील. मंदिराला पाडून मशीदीची निर्मिती करण्यात आली नव्हती. मात्र आता असे होऊ शकते. मशीद बनवण्यासाठी मंदिर पाडले जाऊ शकते. 

सुप्रीम कोर्टाने मंदिराच्या बाजूने दिला होता निकाल

साजिद रशीदी यांचे हे विधान वादग्रस्त असण्यामागचे कारण म्हणजे राम मंदिराच्या निर्मितीसाठी सुप्रीम कोर्टाने मंदिराच्या बाजूने निकाल दिला होता. सुप्रीम कोर्टाने ९ नोव्हेंबरला आपल्या निर्णयात मुस्लिम पक्षाचे म्हणणे फेटाळत सर्वसंमतीने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला होता. कोर्टाने मशीद निर्मितीसाठी अयोध्येमध्ये पाच एकर जमीन देणायाचेही आदेश दिले. सोबतच सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या निर्मितीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्याचेही आदेश दिले होते. 

मोदींच्या हस्ते भूमिपूजन आणि शिलान्यास

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर सरकार मंदिर निर्मितीच्या दिशेने पुढे गेले. मुस्लिम समाजाने कोर्टाच्या या निर्णयाचा स्वीकार केला मात्र असदुद्दीन औवेसी तसेच साजिद रशीदी यांच्यासारखे नेते हे प्रकरण पुन्हा फुलवण्याचे काम करत आहेत. अयोध्येत पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन आणि शिलान्यास झाला. 

पंतप्रधान मोदींप्रमाणे मी ही भावूक आहे - ओवेसी

अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर ऑल इंडिया मजलिस एक इत्तेहादुल मुस्लिमीन(एमआयएमआयएम)चे प्रमुख असदुद्दीन औवेसी म्हणाले, पंतप्रधान या क्षणाने भावुक झाले. मीही भावूक झालो. कारण मी समान नागरिकताच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो. मी भावूक आहे कारण ४५० वर्षांपासून तेथे मशीद होती. 

पंतप्रधानांनी आपल्या पदाचे उल्लंघन केले

एमआयएमआयएमते नेते म्हणाले, भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. राम मंदिराचा शिलान्यास करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या शपथेचे उल्लंघन केले. हे भारताच्या लोकशाही तसेच धर्मनिरपेक्षतेचा पराजय आहे आणि हिंदुत्वाचा विजय आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी