Booster Dose : बूस्टर डोस घेण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नाही, ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणावर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

senior citizen booster dose ज्या ज्येष्ठ नागरिकांना गंभीर आजार आहेत त्यांना बूस्टर डोस घेण्यापूर्वी कुठल्याही प्रकारे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. बुस्टर डोस घेण्यापूर्वी गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

booster dose
बुस्टर डोस 
थोडं पण कामाचं
  • बूस्टर डोस घेण्यापूर्वी कुठल्याही प्रकारे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही
  • गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
  • गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

Booster Dose : नवी दिल्ली : ज्या ज्येष्ठ नागरिकांना गंभीर आजार आहेत त्यांना बूस्टर डोस घेण्यापूर्वी कुठल्याही प्रकारे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. बुस्टर डोस घेण्यापूर्वी गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे. ज्या राज्यात निवडणुका आहेत, त्या निवडणुकीत काम करण्यासाठी जाणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना फ्रंटलाईन कर्मचार्‍यांच्या श्रेणीमध्ये गणले जाणार आहे. भारत सरकारने लसीकरण अभियानाची कक्षा वाढवली असून ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वर्शातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. ( All persons aged 60yrs&above with co-morbidities will not be required certificate from doctor says Health ministry)

किशोरवयीन मुलांचे लसीकरण 

३ जानेवारी २०२२ पासून देशातील १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण होईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी केली होती. तसेच १० जानेवारी पासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचार्‍यांना बूस्टर डोस देण्यात येईल, कोरोनाशी लढताना फ्रंटलाईन कर्मचार्‍यांनी उत्तम कामगिरी केली होती असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.  किशोरवयीन मुलांसाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नाव नोंदणी होईल अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.  


डॉक्टरांचा सल्ला घ्यावा 

गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही बुस्टर डोस देण्यात येईल. तेव्हा पंतप्रधान मोदींनी बुस्टर डोस ऐवजी प्रिकॉशन डोस म्हणजेच खबरदारी म्हणून घेतलेली लस असा उल्लेख केला होता. ज्येष्ठ नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोस घ्यावा असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे. जगात ओमिक्रॉनचे संकट वाढत असताना जगातील अनेक देशांत बूस्टर डोस देण्या़त आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी