Alon Musk : ॲलन मस्कने ट्विटरच्या भारतीय टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, कठीण पावले उचलण्याची मस्कने व्यक्त केली गरज 

Twitter : ट्विटरचे नवे मालक ॲलन मस्कने ट्विटरचा भारतीय टीमला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या टीममध्ये २५० कर्मचारी होते. कंपनीने कर्मचार्‍यांना हा मेल पाठवून कॉस्ट कटिंग केल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच ॲलन मस्कने ट्विटर विकत घेतले. त्यानंतर मस्कने ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पदावरून हटवले. तसेच मोठ्या चार अधिकार्‍यांनाही कामावरून काढून टाकले.

alon musk twitter
ॲलन मस्कने ट्विटर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ट्विटरचे नवे मालक ॲलन मस्कने ट्विटरचा भारतीय टीमला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार या टीममध्ये २५० कर्मचारी होते.
  • कंपनीने कर्मचार्‍यांना हा मेल पाठवून कॉस्ट कटिंग केल्याचे म्हटले आहे.

Twitter : नवी दिल्ली:  ट्विटरचे नवे मालक ॲलन मस्कने ट्विटरचा भारतीय टीमला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या टीममध्ये २५० कर्मचारी होते. कंपनीने कर्मचार्‍यांना हा मेल पाठवून कॉस्ट कटिंग केल्याचे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच ॲलन मस्कने ट्विटर विकत घेतले. त्यानंतर मस्कने ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पदावरून हटवले. तसेच मोठ्या चार अधिकार्‍यांनाही कामावरून काढून टाकले. त्यानंतर ट्विटरमध्ये मोठ्या प्रमाणात कॉस्त कटिंग होईल असे सांगितले जात होते. ट्विटरने आपल्या कर्मचार्‍यांना एक ई मेल पाठवला आहे. आपण एका योग्य मार्गावर जाण्यासाठी शुक्रवारी ग्लोबल वर्कफोर्स कमी करण्याची कठिण प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती या मेलमध्ये दिली होती. (alon musk fires twitter indian team after taking over twitter)

अधिक वाचा : Europe Heatwave: उकळणारा युरोप, 3 दशकातील सर्वाधिक उष्णतेने होरपळला युरोप, ग्लोबल वार्मिंगचा रुद्रावतार

मस्क यांनी ट्विटरमधील भारतातील सर्व कर्मचारी हटवला आहे. ही टीम ट्विटर मोमेंट्स फीचरसाठी आशय निर्मिती करायची. तसेच कम्युनिकेशन्स, ग्लोबल कंटेंट पार्टनरशिप, सेल्स आणि जाहिरात, इंजिनीअरिंग आणि प्रोडक्ट टीमलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या टीममधील ५० टक्के कर्मचार्‍यांना कंपनीतून काढण्यात आले आहे. तर कंत्राटावर असणार्‍या काही कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर ठेवण्यात आले आहे. कंपनीच्या पब्लिक पॉलीसी टीममध्ये काम करणारे यश अग्रवला यांनी ट्विट करून आपल्याला कामावरून काढून टाकण्यात आल्याचे सांगितले होते. डिसेंबरमध्ये संपूर्ण जगात ट्विटरचे साडे सात हजार कर्मचारी कार्यरत होते. 

अधिक वाचा : Aurangzeb Birthday: म्हणून औरंगजेबची कबर महाराष्ट्रात आहे, जाणून घ्या या मागील कारण


ट्विटरचा कर्मचार्‍यांना मेल

यापूर्वी ट्विटरकडून कर्मचार्‍यांना मेल आला होता. त्यात आपण एका योग्य रस्त्यावर जाण्यासाठी शुक्रवारी ग्लोबल वर्कफोर्स कमी करण्याची कठीण प्रक्रिया सुरू करणार आहोत. यामुळे ट्विटरसाठी आपले योगदान देणार्‍या कर्मचार्‍यांनाही फटका बसणार आहे. परंतु ट्विटरला यशाचा मार्ग मिळवण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे असे मेलमध्ये म्हटले होते. आपल्या स्पॅम फोल्डरमधील मेल तपासण्यासाठी यात म्हटलेहोते. जर तुमची नोकरी गेली असेल तर ट्विटरच्या एका ईमेल मध्ये तुम्हाला याबाबत माहिती मिळे असेल या मेलमध्ये म्हटले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी