Amarnath Yatra: अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, 15 यात्रेकरुंचा मृ्त्यू, चाळीसहून अधिक बेपत्ता, NDRF ची टीमकडून बचावकार्य सुरू

Cloudburst in Amarnath : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार, ढगांचा स्फोट गुहेपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. मदत आणि बचाव कार्य जोरात सुरू झाले आहे.

 Amarnath Yatra: अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी, किमान 2 जणांचा मृत्यू, NDRF ची टीम गुंतली बचावकार्यात
Amarnath Yatra: Cloud bursts near Amarnath cave, killing at least 2 people, NDRF team engaged in relief and rescue  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अमरनाथ गुहेजवळ ढग फुटली
  • अनेक जखमी या घटनेत किमान २ जणांचा मृत्यू झाला
  • अमरनाथ गुहेजवळ हजारो भाविक उपस्थित होते

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ढगफुटीमुळे प्राथमिकरित्या 15 लोकांचा मृत्यू झाला असून चाळीस पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत. जखमींना एअरलिफ्ट केले जात आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफसह आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व यंत्रणा बचाव कार्यात गुंतल्या आहेत. (Amarnath Yatra: Cloud bursts near Amarnath cave, killing at least 2 people, NDRF team engaged in relief and rescue)

अधिक वाचा : Online Fraud : ऑनलाइन फर्निचर विकणे पडले महागात, फसवणूक करणाऱ्यांनी खात्यातून लंपास केली 3 लाखांहून अधिक रक्कम

सायंकाळी 5.30 च्या सुमारास अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. पहलगाम संयुक्त पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले की, लोकांना तेथून काढले जात आहे.

जखमींना एअरलिफ्ट केले जातेय

आयटीबीपीच्या म्हणण्यानुसार, अमरनाथ मंदिराजवळील काही लंगरचेही नुकसान झाले आहे. जखमींना आणण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहेत. ढगफुटीमुळे डोंगरावरून मुसळधार पाणी आणि ढिगारा खाली येऊ लागला. सध्या पाऊस थांबला आहे. जखमींना एअरलिफ्ट केले जात आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

गृहमंत्र्यांनी उपराज्यपालांशी चर्चा 

गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडून अमरनाथ गुहेत ढगफुटीमुळे आलेल्या महापुराची माहिती घेतली. एनडीआरएफ, एसडीआरएफ, बीएसएफ आणि स्थानिक प्रशासन बचाव कार्यात गुंतले असल्याचे शाह यांनी ट्विट केले आहे. लोकांचे जीव वाचवणे ही आमची प्राथमिकता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी