भारतात पाहायला मिळेल Supermoon चा दुर्मिळ आणि अद्भूत नजारा, अजिबात चुकवू नका वेळ

Supermoon 2022 Date & Time: सुपरमून 2 ते 3 दिवस दिसण्याची शक्यता आहे. सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे.

Supermoon
Supermoon चा दुर्मिळ आणि अद्भूत नजारा 
थोडं पण कामाचं
  • सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे.
  • काल आषाढ शुक्ल पक्षाची पौर्णिमा होती, ज्याला गुरूपौर्णिमा असं म्हणतात.
  • या दिवशी गुरूंच्या आशीर्वादाने धन, सुख आणि शांती प्राप्त होते.

नवी दिल्ली: Supermoon 2022 Date: भारतात लोकांना सुपरमूनचा (Supermoon) अद्भूत नजारा पाहायला मिळत आहे. 13 जुलै 2022 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सुपरमून पाहायला मिळाला.  सुपरमून 2 ते 3 दिवस दिसण्याची शक्यता आहे. सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे ज्यामध्ये चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. सर्वात जवळ असल्यामुळे चंद्र सर्वसाधारणपणे पृथ्वीपेक्षा मोठा दिसतो. काल आषाढ शुक्ल पक्षाची पौर्णिमा होती, ज्याला गुरूपौर्णिमा असं म्हणतात. असं मानलं जातं की, या दिवशी गुरूंच्या आशीर्वादाने धन, सुख आणि शांती प्राप्त होते.

याला बक मून का म्हटलं जातं? (Why is it called the Buck Supermoon)

13 जुलै रोजी दिसलेल्या सुपरमूनला 'बक मून' असे नाव देण्यात आलं आहे. या काळात हरणाच्या डोक्यावर नवीन शिंगे उगवतात म्हणून याला हरण असं नाव पडलं आहे.

अधिक वाचा-  Breaking News: पुण्यात जुन्या वाड्याची भिंत कोसळली, अग्निशमन दलाकडून 11 जणांना जीवदान 

सुपरमून दिसण्याची तारीख आणि वेळ (Supermoon Date & Timings)

नासाकडून आलेल्या अहवालानुसार, सुपरमून 2 ते 3 दिवस दिसण्याची शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार 13 जुलै, बुधवारी म्हणजेच रात्री 12.8 वाजता दिसला. त्यानंतर ते सलग तीन दिवस दिसणार आहे. त्याच वेळी, 2023 मध्ये, 3 जुलै रोजी सुपरमून दिसणार आहे. आज चंद्र पृथ्वीपासून सुमारे 3,57,264 किमी अंतरावर असेल. विशेष म्हणजे यावेळी सूर्य पृथ्वीच्या कक्षेपासून सर्वात दूरच्या बिंदूवर असेल तेव्हा बक सुपरमून दिसणार आहे. 

सुपरमून म्हणजे काय?  (What Is Supermoon)

जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा सुपरमूनचं दर्शन होते. 1979 मध्ये एस्ट्रोलॉजर रिचर्ड नॉल यांनी पहिल्यांदा या घटनेला सुपरमून असे नाव दिलं होतं. वर्षातून 3 ते 4 वेळा सुपरमून होतो आणि ते सतत पाहिले जाऊ शकते. सुपरमूनला डिअर मून, थंडर मून, हे मून आणि विर्ट मून असेही म्हणतात. सुपरमूनच्या दिवशी चंद्र सामान्य दिवसांपेक्षा मोठ्या आकारात उजळलेला असा दिसतो.

अधिक वाचा-  Maharashtra Rain Updates: राज्यात पावसाचं धुमशान, अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर 'या' जिल्ह्यातल्या शाळा बंद

पृथ्वीच्या प्रदक्षिणादरम्यान एक वेळ अशी येते की चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो. पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे या काळात चंद्र खूप मोठा आणि तेजस्वी दिसतो, याला सुपरमून म्हणतात. सामान्यतः पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील सरासरी अंतर 384,400 किमी असते, मात्र सुपरमूनच्या दिवशी हे अंतर काही काळ कमी होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी