मॉलच्या फूड कोर्टमध्ये बंदूक घेऊन घुसला हल्लेखोर; गोळीबारात 4 लोकांचा मृत्यू, अनेक जखमी

रविवारी संध्याकाळी इंडियानामधील ग्रीनवुड पार्क मॉलमध्ये (Greenwood Park Mall) गोळीबाराची घटना घडली आहे.

America Shooting in the mall
अमेरिकेत पुन्हा गोळीबार  |  फोटो सौजन्य: AP
थोडं पण कामाचं
  • पुन्हा इंडियाना (Indiana) येथे गोळीबार (Firing) झाल्याची बातमी समोर येतेय.
  • या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
  • जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे

वॉशिंग्टन: अमेरिकेत (America)  दिवसेंदिवस गोळीबाराच्या घटना झपाट्यानं वाढू लागल्या आहेत. आता पुन्हा इंडियाना (Indiana) येथे गोळीबार (Firing)  झाल्याची बातमी समोर येतेय. रविवारी संध्याकाळी इंडियानामधील ग्रीनवुड पार्क मॉलमध्ये (Greenwood Park Mall) गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झालेत. CNN नं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. मृतांमध्ये एका संशयित बंदूकधाऱ्याचा ही समावेश आहे. जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

मृतांमध्ये संशयित बंदूकधाऱ्याचा समावेश असल्याची माहिती ग्रीनवुडचे महापौर मार्क मायर्स यांनी दिली. या गोळीबारादरम्यान हल्लेखोराला गोळी लागली. महापौर मार्क मायर्स यांनी ट्विट केलं की, ही शोकांतिका आपल्या समुदायाला खूप दुखावली आहे. कृपया पीडित आणि मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करा.

अधिक वाचा- Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान, द्रौपदी मुर्मू यांचा मोठा विजय अपेक्षित

एक व्यक्ती रायफल आणि गोळ्या घेऊन ग्रीनवूड पार्क मॉलमध्ये घुसला असल्याचं ग्रीनवूड पोलीस विभागाचे प्रमुख जिम इसन यांनी सांगितलं. या हल्लेखोऱ्यानं फूड कोर्टमध्ये गोळीबार सुरू केला. इसान यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, एका नागरिकानं त्या बंदूकधाऱ्याची हत्या केली. या घटनेत एकूण चार जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. अधिकार्‍यांनी इतर पीडितांसाठी संपूर्ण मॉलमध्ये शोध मोहीम राबवली, मात्र गोळीबार फक्त फूड कोर्टमध्ये झाल्याची माहिती त्यांनी दिली. 

ग्रीनवूड पोलीस विभागाने मॉलचा ताबा घेतला आहे. मी कमांड पोस्टच्या थेट संपर्कात आहे आणि यापुढे कोणताही धोका नाही, असं ग्रीनवूडचे महापौर मार्क मायर्स म्हणाले. सध्यातरी या भागापासून दूर राहण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आहे. 

अमेरिकेत दर आठवड्याच्या शेवटी बंदुकीचं प्रदर्शन 

अमेरिकेत शेकडो स्टोअर्स, शॉपिंग आऊटलेट्स आणि छोटी दुकाने आहेत जिथे बंदुकांची विक्री केली जाते. अमेरिकेत दर आठवड्याच्या शेवटी बंदुकांचं प्रदर्शन भरवण्यात येते. तिथे वॉलमार्टसारख्या मोठ्या कंपन्यांच्या दुकानांपासून ते छोट्या दुकानांपर्यंत बंदुका विकल्या जातात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी