नवी दिल्ली : काही वेळापूर्वी आपल्यासोबत व्यक्ती घरी गेला आणि काही वेळानंतर आपल्याला त्याच्या मृत्यूची बातमी यावी, हे असं कधी घडलं तर आपले हातपाय सुन्न पडत असतात. त्यात जर जगाचा निरोप घेणार व्यक्ती जर आपल्या कुटुंबातील असली तर धक्का आपल्याला कोमामध्ये नेणारा ठरत असेल. अशाच धक्का रेडिसन ब्ल्यू हॉटेलचे (Radisson Blu Hotel) मालक अमित जैन (Amit Jain) यांच्या लहान भावाला बसला. अमित जैन यांनी आपल्या लहान भावाला गाझियाबाद (Ghaziabad)येथील ऑफिसमध्ये सोडले आणि मिटिंगला जातो म्हणून त्याचा निरोप घेतला. पण तो निरोप एका भावाला एका भावाला दूर करणारा असेल असं कधी अमितच्या भावाला वाटले नसेल. पंचतारांकित हॉटेल रेडिसन ब्लूचे मालक अमित जैन यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय. (Amit Jain committe suicied after leave his younger brother to office)
अधिक वाचा : भाजप प्रवक्त्याकडून शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान
सकाळी साडे आठच्या सुमारास अमित अगदी नेहमी घरातून बाहेर पडतात तसे घराबाहेर पडले. कारमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे लहान भाऊही होते. अमित जैन यांनी आपल्या भावाला गाझियाबाद येथील कार्यालयात सोडले. नंतर मीटिंगला जातो, असं सांगून ते तेथून निघून गेले. दुपारी त्यांचा मुलगा आदित्य काही सामान घेण्यासाठी खेळगाव येथील फ्लॅटवर पोहोचला असता त्यांना वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. अमित यांच्या जाण्याने त्यांच्या पत्नी नीतू जैन आणि मुलगी खुशी जैन यांना मोठा धक्का बसला आहे.
अधिक वाचा : मेटा, अॅमेझॉननंतर 'या' कंपनीतून कर्मचारी कपात
दरम्यान, रेडिसन ब्ल्यू हॉटेलचे मालक अमित जैन यांनी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. एवढ्या मोठ्या हॉटेलच्या मालकाने आत्महत्येचं पाऊल का उचलले, असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. दरम्यान पोलिसांनी यावर प्राथमिक तपासात उत्तर दिलं आहे. अमित जैन यांच्यावर कर्जाचा भार होता, यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचा सांगण्यात येत आहे. दरम्यान, बँका कर्ज परत करण्यासाठी त्यांचा छळ केला करत होत्या का? याचाही शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. त्यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स पोलीस मिळवत आहेत.
अधिक वाचा : या आजारांमुळेही घामाची येत असते दुर्गंधी
अमित जैन यांच्यावर बँकेच्या कर्जाचा भार होता, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. अमित जैन यांनी कोविडदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शंभर कोटींचे कर्ज घेतले होते. परंतु आता ते कर्ज फेडण्यास असमर्थ होते. यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. व्यवसायात झालेल्या नुकसानीनंतर ते प्रचंड अस्वस्थ झाले होते, मात्र ते टोकाचं पाऊल उचतील, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.
दरम्यान, कोविडच्या काळात छोट्या-मोठ्या अशा अनेक व्यावसायिकांना आपला व्यवसाय बंद करावा लागला किंवा त्यांना नुकसान सहन करावे लागले. याकाळात व्यवसाय बंद असल्याने अनेकांना आर्थिक फटका बसला असून कोविडच्या काळातील नुकसानीचे परिणाम आता दिसून येत आहेत. हा काळ व्यवसायिकांसाठी किती नुकसानकारक होता याची प्रचिती आपल्याला अमित जैन यांच्या आत्महत्येतून आली. कोविडच्या काळात सगळेच हॉटेल बंद राहिल्याने व्यवसायात प्रचंड मोठं नुकसान झाले त्यामुळे अमित जैन यांना खूप त्रास सहन करावा लागला. कर्जाचे व्याज वाढतच गेले आणि कर्जाची रक्कम मोठी होत गेली. अशा परिस्थितीत अमित यांनी धैर्याने परिस्थितीला सामोरे जाण्याऐवजी टोकाचं पाऊल उचललं.