अमित शहांचा ३ दिवसांचा जम्मू काश्मीर दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते श्रीनगर विमानतळावर श्रीनगर-शारजा विमान सेवेचे उद्घाटन करतील. जम्मू काश्मीरमधील दोन मेडिकल कॉलेजांची पायाभरणी करतील.

Amit Shah to begin 3-day visit to Jammu and Kashmir today
अमित शहांचा ३ दिवसांचा जम्मू काश्मीर दौरा 
थोडं पण कामाचं
 • अमित शहांचा ३ दिवसांचा जम्मू काश्मीर दौरा
 • जम्मू काश्मीरमधील दोन मेडिकल कॉलेजांची पायाभरणी करतील
 • जम्मू काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेतील

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते श्रीनगर विमानतळावर श्रीनगर-शारजा विमान सेवेचे उद्घाटन करतील. जम्मू काश्मीरमधील दोन मेडिकल कॉलेजांची पायाभरणी करतील. उद्या (रविवार २४ ऑक्टोबर २०२१) एक सभा घेतील. एका उच्चस्तरिय बैठकीत जम्मू काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेतील. जम्मू काश्मीरची जम्मू काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासीत प्रदेशांमध्ये पुनर्रचना केल्यानंतर अमित शहा यांचा हा जम्मू काश्मीरचा पहिला दौरा आहे. या दौऱ्यात अमित शहा यांच्यासोबत गृह सचिव ए. के. भल्ला, गृह मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे प्रमुख अधिकारी, गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी जम्मू काश्मीर दौऱ्यावर येणार आहेत. Amit Shah to begin 3-day visit to Jammu and Kashmir today

असा आहे अमित शहांचा दौरा

 1. उधमपूर आणि हंदवारा येथे मेडिकल कॉलेजांची पायाभरणी
 2. श्रीनगर-शारजा विमान सेवेचे उद्घाटन
 3. रविवार २४ ऑक्टोबर २०२१ रोजी जम्मू शहरात एक सभा घेतील
 4. जम्मूतील आयआयटी विभागाचे उद्घाटन
 5. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजमधून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा
 6. जम्मू काश्मीरमधील पंचायत राज व्यवस्थेचे प्रतिनिधी असलेल्या पंच, सरपंच, बीडीसी आणि डीडीसी सदस्यांशी संवाद साधतील
 7. श्रीनगरमध्ये एक बैठक घेतील. या बैठकीत जम्मू काश्मीर या केंद्रशासीत प्रदेशाच्या सुरक्षेचा आढावा घेतला जाईल. दहशतवाद्यांनी मागील काही दिवसांत नागरिकांच्या हत्या केल्या आहेत. या कारवायांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या उपायांचाही आढावा घेतला जाईल. या बैठकीत पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंह आणि जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित असतील. 
 8. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त, श्रीनगर आणि जम्मू शहरातील सुरक्षेत वाढ, ठिकठिकाणी नव्या हंगामी तपासणी नाक्यांची निर्मिती, संशयास्पद हालचाली आढळल्यास लगेच तपासणी
 9. शेर ए काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरकडे जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूक तीन दिवसांसाठी बंद. परवानगी असलेल्यांनाच कन्व्हेंशन सेंटरच्या विशिष्ट भागात वाहन नेता येणार.
 10. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे. ड्रोनद्वारे हालचालींवर सुरक्षा यंत्रणेचे बारकाईने लक्ष. निवडक ठिकाणी तपासणीसाठी सुरक्षा पथकांच्या प्रशिक्षित श्वानांची (कुत्र्यांची) नियुक्ती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी