संसदेत चर्चा करुया, अमित शहांची राहुल गांधींच्या प्रश्नांवर थेट प्रतिक्रिया

amit shah to rahul gandhi ready for debate in parliament राहुल गांधींनी चीनविषयी विचारलेल्या प्रश्नांवर संसदेत चर्चेसाठी केंद्र सरकार तयार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

amit shah
अमित शहा  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • संसदेत चर्चा करुया, अमित शहांची राहुल गांधींच्या प्रश्नांवर थेट प्रतिक्रिया
  • राष्ट्रीय पक्षाच्या माजी अध्यक्षाने पातळी सोडून राजकारण करणे दुर्दैवी
  • पाकिस्तान आणि चीनला जे आवडते तेच काँग्रेस करते

नवी दिल्ली: राहुल गांधी (rahul gandhi) पातळी सोडून राजकारण (ओछी राजनिती) करत आहेत. त्यांनी चीन (china) या विषयावर विचारलेल्या प्रश्नांवर संसदेत चर्चा (parliament debate) करण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) म्हणाले. चीन प्रश्नावर १९६२ पासून आतापर्यंत काय काय झाले यावर सविस्तर चर्चा करता येईल असे शहा यांनी सांगितले.

'१९६२ से आज तक दो दो हाथ हो जाए' अशा शब्दात अमित शहा यांनी राहुल गांधी यांना खुले आव्हान दिले. कोणताही पुरावा हाती नसताना मोदी सरकारने भारताची जमीन चीनला बळकावू दिली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. या आरोपाचा संदर्भ देत 'एएनआय'ने अमित शहा यांना मुलाखतीत प्रश्न विचारला. 'एएनआय'च्या प्रश्नाला उत्तर देताना शहा यांनी संसदेत चीन प्रश्नावर चर्चा करुया, सर्व माहिती देतो, असे सांगितले.

राष्ट्रीय पक्षाच्या माजी अध्यक्षाने पातळी सोडून राजकारण करणे दुर्दैवी

भारतविरोधी कारवाया आणि भारतविरोधी प्रचार ही परिस्थिती हाताळण्यासाठी मोदी सरकार सक्षम आहे. मात्र एका राष्ट्रीय पक्षाचे माजी अध्यक्ष या परिस्थितीत पातळी सोडून राजकारण करत आहेत आणि ही दुर्दैवी बाब असल्याचे अमित शहा म्हणाले.

पाकिस्तान आणि चीनला जे आवडते तेच काँग्रेस करते

सोशल मीडियावर काँग्रेस पक्षाने वापरलेले हॅशटॅग पाकिस्तान आणि चीन भारतविरोधी प्रचारासाठी वापरत आहे. याचा अर्थ पाकिस्तान आणि चीनला जे आवडते तेच काँग्रेस पक्ष करत आहे, असेही अमित शहा म्हणाले. भारत-चीन प्रश्नावर सरकारकडून माहिती प्रसिद्ध केली जात आहे. सैन्य दलांकडूनही भाष्य सुरू आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.

राष्ट्रीय सुरक्षा आणि कोरोनाचे आव्हान हाताळण्यास सरकार सक्षम

सरकार राष्ट्रीय सुरक्षा आणि कोरोना या दोन्ही आव्हानांना योग्य प्रकारे हाताळत आहे. संसदेचे अधिवेशन होणारच आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार चीन प्रश्नावर चर्चेसाठी तयार आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.

याआधी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला सैनिक विना शस्त्र चिनी सैनिकांशी कसे लढले, त्यांच्याकडे शस्त्र का नव्हते, असा  प्रश्न विचारला होता. हा प्रश्न विचारताना यूपीए सरकारच्या कार्यकाळात २००५ मध्ये मनमोहन सिंह सरकारने चीनसोबत केलेल्या कराराचा उल्लेख करणे त्यांनी टाळले होते. या करारामुळे भारत चीनचे सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि तिच्या भोवतालच्या दोन्ही देशांच्या हद्दीत तणाव वाढला तरी शस्त्र वापरुन गोळीबार करत नाहीत; तोफगोळे, मॉर्टर यांचा वापर करू शकत नाहीत.

भारत-चीन दरम्यान तणाव

लडाखच्या (ladakh) पूर्वेकडील भागात भारत (india) आणि चीनच्या (china) सैनिकांमध्ये २४ तासात ३ वेळा प्राणघातक संघर्ष (faceoff) झाला. दोन्ही देशांदरम्यान १९७५ नंतर पहिल्यांदाच असे घडले. या संघर्षात कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले. चिनी सैनिकांना मारता मारता भारतीय जवान हुतात्मा झाले. चीनच्या ४३ 'कॅज्युअल्टी' झाल्याचे भारत सरकारने जाहीर केले. प्रत्यक्षात हा आकडा खूप मोठा असून चीन सरकार हा आकडा जाहीर करणे टाळत असल्याचे समजते. चीनने लडाखच्या पूर्वेकडील भागात गलवान खोऱ्यात भारताच्या हद्दीमध्ये घुसखोरी करुन एक चौकी बांधल्यामुळे तणाव निर्माण झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघर्षानंतर दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या देशाच्या हद्दीत असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावपूर्ण शांतता आहे. मागील ५ दशकांपेक्षा अधिक काळापासून जो भूभाग भारताच्या ताब्यात आहे तो आजही भारताकडेच आहे. मात्र चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ सैन्याची मोठी कुमक आणल्यामुळे तणाव कायम आहे. दोन्ही देशांचे सैन्य युद्ध सज्ज स्थितीत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी