अमित शहांचा प. बंगाल दौरा, भाजपमधील इनकमिंगमुळे TMC अस्वस्थ

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याच्या निमित्ताने राज्यातील अनेक लहान मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

amit shah west bengal visit tmc cpi cpm and congress mp mlas joined bjp
अमित शहांचा प. बंगाल दौरा, भाजपमधील इनकमिंगमुळे TMC अस्वस्थ 

थोडं पण कामाचं

 • अमित शहांचा प. बंगाल दौरा, भाजपमधील इनकमिंगमुळे TMC अस्वस्थ
 • तृणमूल काँग्रेसचे शुवेंदु अधिकारी भाजपमध्ये दाखल
 • TMC, CPI, CPM, काँग्रेसमधून नऊ आमदार आणि एक खासदार भाजपमध्ये दाखल

कोलकाता: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याच्या निमित्ताने राज्यातील अनेक लहान मोठ्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि काँग्रेसच्या निवडक नेत्यांचा समावेश होता. शुवेंदु अधिकारी यांच्या भाजप प्रवेशाने तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. शुवेंदु अधिकारी हे तृणमूलचे दिग्गज नेता होते. (amit shah west bengal visit tmc cpi cpm and congress mp mlas joined bjp)

पश्चिम बंगालमध्ये पुढल्या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक डोळ्यापुढे ठेवून भाजपच्या राजकीय हालचाली सुरू आहेत. अमित शहा यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याच्या निमित्ताने भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाले. या इनकमिंगमुळे भाजपचा उत्साह वाढला आहे तर तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि काँग्रेसकडून विशेष नुकसान झालेले नाही, असा दावा केला जात आहे. पण शुवेंदु अधिकारी यांच्यासोबत त्यांच्या हजारो समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे तृणमूलची प्रसारमाध्यमांना सामोरे जाताना दिवसभर दमछाक उडाली.

शुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावत होते. तसेच ते तृणमूल काँग्रेसच्या संघटनात्मक कामातही मोठी भूमिका बजावत होते. त्यांच्या भाजप प्रवेशाचा मोठा राजकीय परिणाम निवडणुकीत दिसेल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. शुवेंदु अधिकारी यांच्या व्यतिरिक्त तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेसच्या निवडक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात नऊ आमदार आणि एक खासदार यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधील प्रभावी लोकप्रतिनिधी भाजपमध्ये दाखल झाल्यास विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला राजकीय लाभ होईल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. 

 1. आमदार सुनिल मोंडल, तृणमूल काँग्रेस
 2. आमदार बनासरी मैती, तृणमूल काँग्रेस
 3. आमदार विश्वजीत कुंडु, तृणमूल काँग्रेस
 4. आमदार सैकत पांजा, तृणमूल काँग्रेस
 5. आमदार शिलभद्र दत्ता, तृणमूल काँग्रेस
 6. आमदार सुकरा मुंडा, तृणमूल काँग्रेस
 7. आमदार सुदीप मुखर्जी, काँग्रेस
 8. आमदार तापसी मोंडल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी
 9. आमदार अशोक दिंडा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
 10. खासदार दिपाली बिस्वास (मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी निवडणूक जिंकून नंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश आणि तृणमूलमधून आता भाजपमध्ये प्रवेश)

अमित शहा यांनी पश्चिम बंगाल दौऱ्याच्या निमित्ताने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या वर्तुळातील निवडक लोकांच्या भल्याचाच विचार करतात. राज्यात कायदा सुव्यवस्था अडचणीत आहे. भ्रष्टाचार वाढला आहे आणि विकास कमां थंडावले असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला. विकास होत नसल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये रोजगार निर्मिती होत नसल्याचाही आरोप अमित शहा यांनी केला. तृणमूल काँग्रेसने अमित शहांचे आरोप फेटाळले. राजकीय हेतूने अमित शहा आरोपांची राळ उडवत आहे. या आरोपांमध्ये तथ्य नाही, असे तृणमूल काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी