'Har Ghar Tiranga' abhiyan: अमित शाह करणार तिरंगा महोत्सवाची सुरुवात, 'हर घर तिरंगा' मोहिमेचे व्हिडिओ-थीम साँग होणार लाँच

स्वातंत्र्याच्या (freedom) ७५ वर्षांच्या निमित्तानं देश ‘अमृत महोत्सव’ (Amrit Festival) साजरा करत आहे. 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga abhiyan ) मोहिमेसाठी लोकांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला चळवळ बनवण्यासाठी दिल्लीत मोठा पुढाकार घेतला जाणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) आज 'हर घर तिरंगा' अभियान महोत्सवाची सुरुवात करणार आहेत.

The video-theme song of the 'Har Ghar Tiranga' campaign will be launched
'हर घर तिरंगा' मोहिमेचे व्हिडिओ-थीम साँग होणार लाँच   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्तानं देश आज 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करत आहे.
  • 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सरकारने 25 कोटी घरांवर तिरंगा फडकवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
  • पीएम मोदींनी लोकांना त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे.

Har Ghar Tiranga abhiyan : स्वातंत्र्याच्या (freedom) ७५ वर्षांच्या निमित्तानं देश ‘अमृत महोत्सव’ (Amrit Festival) साजरा करत आहे. 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga abhiyan ) मोहिमेसाठी लोकांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला चळवळ बनवण्यासाठी दिल्लीत मोठा पुढाकार घेतला जाणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) आज 'हर घर तिरंगा' अभियान महोत्सवाची सुरुवात करणार आहेत. राजधानीत होणाऱ्या या कार्यक्रमात 'हर घर तिरंगा' मोहिमेचे व्हिडिओ आणि थीम साँग (Theme song) आज लाँच करण्यात येणार आहे. इतकेच नाही तर तिरंग्याची रचना करणाऱ्या पिंगली व्यंकय्या यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटही काढण्यात येणार आहे.

सोशल मीडिया प्रोफाइलवर तिरंगा लावण्याचे पंतप्रधानांचे आवाहन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाला चळवळ बनवण्याचे आवाहन केले आहे. रविवारी त्यांच्या 'मन की बात'मध्ये पंतप्रधान म्हणाले की, 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत 'हर घर तिरंगा' मोहीम देशभरात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाईल. लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ते म्हणाले, 'तिरंगा आपल्याला एकत्र जोडतो आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो. पंतप्रधानांनी लोकांना 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर राष्ट्रध्वजाचे चित्र टाकण्याचे आवाहन केले.

Read Also : शेवटच्या षटकातील दोन चेंडूंतच वेस्ट इंडिजनं मिळवला विजय

25 कोटी घरांमध्ये तिरंगा फडकवण्याचे लक्ष्य

''हर घर तिरंगा' मोहिमेशी मोठ्या संख्येने लोकांना जोडण्याची तयारी सुरू आहे. सरकारने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरातील सुमारे 25 कोटी घरांमध्ये तिरंगा फडकवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी केंद्र सरकार, सांस्कृतिक मंत्रालयाने तिरंगा मोहिमेत सहभागी होण्यासाठी सर्व राज्ये आणि व्यापारी संघटनांशी संपर्क साधला आहे.

Read Also : साहेब! 15 दिवसांची सुट्टी द्या, मला बाप बनायचं आहे

दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, ओडिशा, बिहार आणि राजस्थान या घटकांनी आपापल्या राज्यातील कापड उत्पादनांशी संपर्क साधून त्यांना मोठ्या संख्येने राष्ट्रध्वज बनवण्यास प्रवृत्त करावे, असे सांगण्यात आले. बाजारात 10 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत विविध आकाराचे तिरंगे उपलब्ध आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी