मेळघाट दुर्घटना, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत : मुख्यमंत्री

Amravati 3 People Died Due To Drinking Contaminated Water : महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीचे दूषित पाणी प्यायल्याने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली.

Amravati 3 People Died Due To Drinking Contaminated Water
मेळघाट दुर्घटना, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत : मुख्यमंत्री  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मेळघाट दुर्घटना, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत : मुख्यमंत्री
  • दूषित पाणी प्यायल्याने अनेकांची तब्येत बिघडली
  • दूषित पाणी प्यायल्याने ३ मृत्यू

Amravati 3 People Died Due To Drinking Contaminated Water : अमरावती : महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये पाचडोंगरी आणि कोयलारी गावात विहिरीचे दूषित पाणी प्यायल्याने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दूषित पाणी पिऊन आजारी पडलेल्यांना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. 

दूषित पाणी प्यायल्याने ५० जणांची तब्येत ढासळली. या सगळ्यांना डायरिया झाला. यापैकी तीनजणांचा मृत्यू झाला आणि ४७ जणांची प्रकृती गंभीर आहे. याव्यतिरिक्त विहिरीचे दूषित पाणी प्यायल्याने २३१ जणांची तब्येत बिघडली. तब्येत बिघडलेल्या २३१ जणांवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच अमरावती जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. परिस्थितीचा आढावा घेतला आणि महत्त्वाचे निर्देश दिले. 

आषाढी एकादशीच्या महापूजेनंतर मंत्रिमंडळाविषयीचे निर्णय जाहीर होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी जाणार आहेत. ही महापूजा करून मुख्यमंत्री परतले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाबाबत चर्चा करतील. या चर्चेअंती मंत्रिमंडळाबाबत घोषणा होईल; अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत दिली. दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दोन दिवसांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची प्रदीर्घ चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात होणार असलेल्या विकासाला केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ लाभेल, असे आश्वासन दिले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी