AMUच्या विद्यार्थ्याला PM मोदींचे कौतुक करणे पडले महाग, रद्द होणार PHD ची डीग्री

Aligarh- AMU PhD student alleges university denied him degree because he praised PM Modi अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी (AMU PhD student) दानिश रहीम याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक करणे महाग पडले.

 Aligarh Muslim University PhD student alleges university denied him degree because he praised PM Modi
AMUच्या विद्यार्थ्याला PM मोदींचे कौतुक करणे पडले महाग, रद्द होणार PHD ची डीग्री 
थोडं पण कामाचं
  • AMUच्या विद्यार्थ्याला PM मोदींचे कौतुक करणे पडले महाग, रद्द होणार PHD ची डीग्री
  • विद्यार्थ्याने पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली
  • विद्यार्थ्याने उच्च न्यायालयातही दाद मागितली

Aligarh- AMU PhD student alleges university denied him degree because he praised PM Modi अलीगड: अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी (AMU PhD student) दानिश रहीम याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक करणे महाग पडले. विद्यापीठ व्यवस्थापनाने दानिशला नोटीस बजावली आहे. ही नोटीस मिळताच दानिशने पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली आहे. तसेच उच्च न्यायालयात (High Court) दाद मागितली आहे.

पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले म्हणून अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या प्रशासनाने माझी पीएचडीची डीग्री रद्द करण्याचा इशारा देणारी नोटीस बजावली आहे, असा आरोप दानिशने केला आहे. या प्रकरणात दानिशने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. विद्यापीठ प्रशासन मात्र वेगळीच माहिती देत आहे. विद्यार्थ्याला चुकून चुकीच्या नावाची डीग्री दिली आहे. या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी सहकार्य करावे म्हणूनच दानिशला नोटीस पाठवल्याचे, विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.

दानिशचे म्हणणे आहे की, त्याला ९ ऑक्टोबर २०२१ रोजी डीग्री मिळाली आणि सहा महिन्यांनंतर डीग्री परत करा, अशा स्वरुपाची नोटीस बजावली आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठाला शंभर वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलल्या भाषणाचे कौतुक केले म्हणून माझ्याकडून डीग्री परत मागवली आहे; असा आरोप दानिशने केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी