An-32 crash: १३ लोकांचे मृतदेह ताब्यात, विमानाचा ब्लॅक बॉक्सही सापडला

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 13, 2019 | 17:48 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

An-32 crash All 13 bodies: एएन ३१ विमान अपघाताच्या १० दिवसानंतर विमानाचे अवशेष ताब्यात घेतले आहेत. या विमानाचा ब्लॅक बॉक्स देखील मिळाला आहे. तर विमानातल्या १३ जणांचा मृत्यू झाला आहे. हवाई दलानं ही माहिती दिली.

An-32 crash
An-32 crash: १३ जणांचे मृतदेह ताब्यात, ब्लॅक बॉक्स सापडला 

An-32 crash Update All 13 bodies, black box of transport aircraft recovered: अरूणाचल प्रदेशमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेलं एएन-३२ विमानासंबधी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. हवाईदलाच्या एका अधिकाऱ्यानं गुरूवारी या संदर्भातली माहिती दिली. तसंच विमानाचा ब्लॅक बॉक्स देखील सापडला आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यानं विमान दुर्घटनेचं नेमकं कारण समजण्यास मदत होणार आहे. हवाईदलानं ही माहिती अरूणाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात बचाव दलाकडून विमानाचे अवशेष ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती देण्यात आली. 

एएन-३२ विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर १० दिवसानंतर याचे अवशेष ताब्यात घेतले गेले. तसंच या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व लोकांचा मृत्यू झाल्याचं स्पष्टिकरण देखील देण्यात आलं. या दुर्घटनेत विंग कमांडर जी एम चार्ल्स, स्कवाड्रन लीडर एच विनोद, फ्लाइट लेफ्टनंट एल आर थापा, एम के गर्ग, आशिष तन्वर आणि सुमित मोहंती, वॉरन्ट ऑफिसर के. के. मिश्रा, सार्जेंट अनूप कुमार, कॉरपोरल शेरीन, एलएसी (लिडींग एअरक्राफ्ट मॅन) , एस. के. सिंग, एलएसी पंकज आणि नॉन-फाइटर राजेश कुमार आणि विद्यार्थी यांचा मृत्यू झाला आहे.  हवाई दलानं अपघातात प्राण गमावणाऱ्या आपल्या शूरांना श्रद्धांजली वाहिली आणि म्हटलं की, या दुःखाच्या क्षणी आम्ही मृतांच्या कुटुंबासोबत आहोत.

भारतीय हवाई दलाने या अपघातात कोणीही जिवंत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या संदर्भात त्या १३ जणांच्या कुटुंबियांना याची माहितीही देण्यात आली आहे. या अपघातग्रस्त एएन-३२ विमानात आठ क्रू मेंबर्ससह १३ प्रवासी होते. ३ जूनपासून हे विमान बेपत्ता होते. दोन दिवसांपूर्वी या विमानाचे अवशेष सापडले आहेत. विमानाचा शोध घेण्यासाठी भारतीय हवाई दल आणि लष्कराच्या जवानांनी दिवस-रात्र एक केली होती. 

Indian Air Force

एका तासात बेपत्ता झालं विमान 

भारतीय हवाई दलाचे एएन-३२ विमान जोरहाट एअरबेसवरून अरूणाचल प्रदेशच्या दिशेनं उड्डाण केल्यानंतर एका तासानंतर बेपत्ता झाले होते. तीन जून रोजी या विमानाने उड्डाण केल्यानंतर अरूणाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात या विमानाचा संपर्क तुटला होता. या विमानाच्या शोधासाठी जवळपास नऊ दिवस मोठी यंत्रणा कार्यरत करण्यात आली होती. यात एसयू-३० जेट लढाऊ विमान, सी१३०जे, एमआय १७ आणि एएलएच हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता. 

तसेच इस्त्रोच्या कार्टोसॅट आणि आरआयसॅट या उपग्रहांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या फोटोंचाही आधार घेण्यात आला होता. त्यानंर अरूणाचल प्रदेशमधील सियांग जिल्ह्यात लीपो गावापासून १६ किलोमीटर अंतरावर या एएन-३२ या दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष सापडले.  समुद्र सपाटीपासून १२ हजार फुटांवर विमान अपघातग्रस्त झाले आहे. अपघाताच्या ठिकाणी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्यावेळी विमानाला दुर्घटना झाली त्यावेळी एएन-३२ हे विमान १७ हजार फूट उंचावर उडत होते. त्यामुळे विमान दुर्घटनेत कोणी वाचले असल्याची शक्यता नसल्याचे हवाई दलाने सांगितले आहे.

बचाव कार्यासाठी गिर्यारोहकांची मदत 

तर बुधवारी हवाई दलानं बचावकार्यासाठी १५ गिर्यारोहकांची देखील मदत घेतली होती. यात हवाईदलाचे ९ गिर्यारोहक, लष्कराचे ४ गिर्यारोहक आणि दोन सामान्य गिर्यारोहकांचा समावेश होता. त्यांना सर्व आवश्यक उपकरणांसह घटनास्थळाकडे रवाना करण्यात आलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
An-32 crash: १३ लोकांचे मृतदेह ताब्यात, विमानाचा ब्लॅक बॉक्सही सापडला Description: An-32 crash All 13 bodies: एएन ३१ विमान अपघाताच्या १० दिवसानंतर विमानाचे अवशेष ताब्यात घेतले आहेत. या विमानाचा ब्लॅक बॉक्स देखील मिळाला आहे. तर विमानातल्या १३ जणांचा मृत्यू झाला आहे. हवाई दलानं ही माहिती दिली.
Loading...
Loading...
Loading...