An encounter breaks out at Chaki Samad DH Pora area of Kulgam Police and security forces are on the job: Police : श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा पथकाने अनंतनाग आणि कुलगाम या दोन जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांना घेरले, चकमकी सुरू आहेत. ताज्या वृत्तानुसार अनंतनाग येथे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा एक स्वयंघोषीत कमांडर ठार करण्यात सुरक्षा पथक यशस्वी झाले. अनंतनागमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यालाही घेरण्यात आले आहे. कुलगाममध्ये डीएच पोरा परिसरातील चाकी समद येथे चकमक सुरू आहे. गुप्तचरांनी दिलेल्या ठोस माहितीआधारे कारवाई सुरू आहे.
सुरक्षा पथकाने ६ एप्रिल २०२२ रोजी अवंतीपोरातील त्राल येथे अंसार गजवत-उल-हिंद (AGuH) या दहशतवादी संघटनेच्या सफत मुजफ्फर सोफी उर्फ मुआविया आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या उमर तेली उर्फ तल्हा त्राल याला ठार केले होते. दोन्ही दहशतवाद्यांवर श्रीनगरमध्ये हिंसक कारवायांसाठी अनेक गुन्हे दाखल होते. खानमोह श्रीनगर येथे सरपंच समीर अहमद यांची हत्या केल्याचाही आरोप त्यांच्यावर होता.
याआधी मैसूमा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान हुतात्मा झाला आणि एक जखमी आहे. जखमी जवानावर एसएमएचएस येथे उपचार सुरू आहेत. याआधी १ एप्रिल २०२२ रोजी शोपियां जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला.