Jammu Kashmir Encounter:  जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

जम्मू कश्मीरच्या श्रीनगरमधील हरवान भागात रविवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आहे.  An encounter broke out between security forces and terrorists in Harwan area of Srinagar, 1 terrorist killed

jammu kashmir encounter
चकमक  
थोडं पण कामाचं
  • श्रीनगरमधील हरवान भागात रविवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली.
  • चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आहे.
  • काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलावर झाला होता हल्ला

Jammu Kashmir Encounter: श्रीनगर:  जम्मू कश्मीरच्या श्रीनगरमधील हरवान भागात रविवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आहे.  हरवान भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. सुरक्षा दलाने या भागात शोधमोहीम राबवली तेव्हा लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला, सुरक्षा दलानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला आणि चकमक उडाली.  (An encounter broke out between security forces and terrorists in Harwan area of Srinagar, 1 terrorist killed)


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हरवन भागात चकमक उडाली या चकमकीत लश्कर ए तैयब्बाचा दहशतवादी ठार झाला.  अमेरिकेच्या परदेश विभागाने दहशतवादावर एक अहवाल जारी केला आहे. त्यानुसार कश्मीरमध्ये लश्कर ए तैय्यबा, जैश ए मोहम्मद, हिज्बुल मुजाहिद्दीन, आयएएस आणि अल कायदाचे दहशतवादी सक्रिय आहेत. 


काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलावर झाला होता हल्ला

१३ डिसेंबर रोजी सुरक्षा दलाच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात  २ जवान शहीद झाले होते  तर १४ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. श्रीनगरच्या जेवन भागात हा हल्ला झाला होता. सोमवारी सकाळी जम्मू कश्मीरच्या श्रीनगरमधील रंगरेथ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. त्यात सुरक्षा दलाला दोन दशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते. मृत दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रासाठा आढळला होता. चकमकीनंतर सुरक्षा दलाने या भागात शोधमोहीम हाती घेऊन या भागात नाकाबंदी केली होती.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी