Air Pollution In India | लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) झालेल्या एका नवीन रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की, भारतातील प्रमुख शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) लोकांचा लवकर मृत्यू होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. गेल्या काही वर्षांत ही संख्या जवळपास एक लाखाच्या घरात पोहचली आहे. (An increase in the number of deaths due to pollution in major cities of India).
युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅम (University of Birmingham) आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) येथील संशोधकांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन मागील आठवड्यात 'सायन्स ॲडव्हान्सेस'मध्ये प्रकाशित झाले. त्यात म्हटले आहे की वेगाने वाढणाऱ्या उष्णकटिबंधीय शहरांमध्ये १४ वर्षांमध्ये वाढत्या वायू प्रदूषणामुळे सुमारे १,८०,००० लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यांना वाचवता आले शकते.
अधिक वाचा : रिझर्व्ह बॅंकेने महाराष्ट्रातील 4 सहकारी बँकांना ठोठावला दंड
दक्षिण आशियातील (South Asia) शहरांमध्ये वायू प्रदूषणाच्या प्रादुर्भावामुळे कमी वयातच लोकांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बांगलादेशातील (Bangladesh) ढाका (Dhaka) येथे अशी सर्वाधिक प्रकरणे समोर आली असून त्यांची संख्या तब्बल २४ हजारांच्या घरात आहे. यासह भारतातील मुंबई, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, सुरत, पुणे आणि अहमदाबादमध्ये अशी एकूण सात लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
मुख्य संशोधक डॉ.करण वोहरा यांनी सांगितले की, जमीन साफ करण्यासाठी आणि शेतातील पेंढा (stubble burning) म्हणजे भुशाची विल्हेवाट लावण्यासाठी जैव-इंधन उघडे जाळणे हे उष्णकटिबंधीय प्रदेशातील वायू प्रदूषणात झपाट्याने वाढ होण्याचे प्रमुख कारण आहे.
ते म्हणाले की, आमचे विश्लेषण असे सांगत आहे की ही शहरे वायू प्रदूषणाच्या नव्या युगात प्रवेश करत आहेत. काही शहरांमध्ये, परिस्थिती एका वर्षात तितकी बिघडते आहे जितकी इतर शहरांमध्ये एका दशकात बिघडते.