Miss Universe 2021 : आनंद महिंद्रासह अनेकांनी केले मिस युनिव्हर्स २०२१ हरनाज संधूचे कौतुक

Miss Universe 2021 Harnaaz Sandhu : मिस युनिव्हर्स २०२१चा (Miss Universe 2021) किताब पटकावल्यानंतर सर्व देशभरातून हरनाजवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रासह (Anand Mahindra)अनेक सेलिब्रिटी आणि मान्यवरांची हरनाज संधूचे कौतुक केले आहे. इस्त्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलोन, कॉंग्रेस नेते रणदिप सिंह सुरजेवाला, क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि फिल्मफेअर मासिकानेदेखील हरनाजचे कौतुक केले आहे.

Miss Universe 2021 Harnaaz Sandhu
हरनाज संधू 
थोडं पण कामाचं
  • हरनाज संधूने २१ वर्षांनी जिंकून दिला मिस युनिव्हर्सचा किताब
  • सर्व देशभरातून हरनाजवर कौतुकाचा वर्षाव
  • सेलिंब्रिटींनी ट्विट करत केले अभिनंदन

Harnaaz Sandhu | नवी दिल्ली : हरनाज संधूने (Harnaaz Sandhu)मिस युनिव्हर्स २०२१चा (Miss Universe 2021) किताब पटकावल्यानंतर सर्व देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रासह (Anand Mahindra)अनेक सेलिब्रिटी आणि मान्यवरांची हरनाज संधूचे कौतुक केले आहे. इस्त्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलोन, कॉंग्रेस नेते रणदिप सिंह सुरजेवाला, क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि फिल्मफेअर मासिकानेदेखील हरनाजचे कौतुक केले आहे. (Anand Mahindra & celebrities praises Miss Universe 2021, Harnaaz Sandhu)

हरनाज संधूचा आत्मविश्वास

मिस युनिव्हर्स किताब जिंकल्याबद्दल हरनाज कौर माझाल टोव, बधाई हो, कॉंग्रॅच्युलेशन्स, असे मत इस्त्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलोन यांनी ट्विट केले आहे. स्पर्धेतील प्रश्नोत्तराच्या वेळेस सूत्रधार आणि अमेरिकेतील टीव्ही स्टार स्टीव्ह हार्व्हेने संधूला विचारले की आजच्या काळात तणावांना तोंड देण्यासाठी कोणता सल्ला ती तरुण महिलांना देईल, यावर हरनाज म्हणाली, 'आजच्या काळात तरुणांसमोरील सर्वात मोठा तणाव हा स्वत:बद्दल विश्वास बाळगण्याचा आहे. आपण एकमेव आहेत आणि त्यामुळेच आपण सुंदर आहोत. दुसऱ्यांशी तुलना न करू नका आणि जगभरात घडत असलेल्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा करूया, हे तरुणाई समजून घेणे आवश्यक आहे. तुम्ही पुढे येऊन तुमच्यासाठी बोलले पाहिजे कारण तुमच्या आयुष्याचे नेते तुम्हीच आहात. तुम्हीच स्वत:चा आवाज आहात. माझा स्वत:वर विश्वास आहे आणि त्यामुळेच मी आज येथे उभी आहे,' असे उत्तर हरनाज संधूने दिले.

हरनाजचे करियर

हरनाज संधूने याआधी अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. यामध्ये लाईव्हा मिस डाईव्हा युनिव्हर्स २०२१ आणि फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९चा या किताबांचा समावेश आहे. संधूने यारा दिया पू बारान आणि बाय जी कुटांगे या चित्रपटातदेखील काम केले आहे. मिस युनिव्हर्स किताब जिंकल्यानंतर हरनाजवर सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव झाला आहे. फिल्मफेअर मासिकाने देखील हरनाजचे कौतुक करताना या वर्षी मिस युनिव्हर्स जिंकल्याबद्दल तुझा आम्हाला अभिमान वाटतो, असे म्हटले आहे.

हरभजन सिंह, आनंद महिंद्राने केले कौतुक

प्रसिद्ध किक्रेटपटू हरभजन सिंहने हरनाज संधूचे कौतुक करताना म्हटले आहे की हरनाज तुझे आणि तुझ्या कुटुंबियांचे अभिनंदन. २१ वर्षांनंतर मिस युनिव्हर्स किताब जिंकल्याबद्दल तुझा अभिमान वाटतो. गॉड ब्लेस यू. तर रणदिप सिंह सुरजेवाला यांनी म्हटले चंदीगढ गर्ल अभिनंदन. तुझ्या जिद्दीला सलाम. तुझा अधिक शक्ती मिळो. तर आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे की आठवड्याची सुरूवात यापेक्षा चांगल्या बातमीने झाली नसती.
हरनाझ संधूने पराग्वे आणि दक्षिण आफ्रिका या स्पर्धकांना मागे टाकून मुकुट जिंकला. भारताकडून 2000 मध्ये लारा दत्ताने विजेतेपद जिंकला होता, म्हणजेच तब्बल 21 वर्षांनी भारताने हा ताज पटकावला असून संपूर्ण भारतीयांसाठी हा गर्वाचा क्षण आहे. जागतिक स्तरावर थेट प्रक्षेपित झालेल्या कार्यक्रमात संधूला मेक्सिकोच्या माजी मिस युनिव्हर्स 2020च्या अँड्रिया मेझा यांनी मुकुट प्रदान केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी