Mahindra On Musk : Twitter बाबत मस्क यांचं धोरण म्हणजे…! आनंद महिंद्रांचा एलॉन मस्कना टोला

ट्विटरवर प्रेरणादायी संदेश प्रसारित करण्यासाठी लोकप्रिय असणारे आनंद महिंद्रा यांनी नुकची एलॉन मस्क यांच्यावर टीका केली आहे. ट्विटरसोबतच्या व्यवहारावरून त्यांनी केलेलं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.

Mahindra On Musk
आनंद महिंद्रांचा एलॉन मस्कना टोला  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आनंद महिंद्रांची एलॉन मस्क यांच्यावर टीका
  • वेळ आणि ऊर्जेचा अपव्यय केल्याची टीका
  • ट्विट होतंय वेगाने व्हायरल

Mahindra on Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे एलॉन मस्क हे सध्या ट्विटरच्या खरेदीबाबत धरसोड वृत्तीमुळे चर्चेत आले आहेत. अगोदर ट्विटरची मालकी खरेदी करणारे मस्क यांनी आपलं मन आता त्यातून काढून घेतलं असून ट्विटर खरेदीचा निर्णय रद्द कऱण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यावरून भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. व्हॉट अ वेस्टेज ऑफ टाईम! असा टोला त्यांनी मस्क यांना लगावला आहे. मस्क यांनी ट्विटरची खरेदी करण्याचा निर्णय आणि त्यानंतर घेतलेली माघार हा सगळा प्रकार म्हणजे वेळेचा निव्वळ अपव्यय असल्याचं महिंद्रांनी म्हटलं आहे. 

मस्क यांच्याबाबतचं ट्विट व्हायरल

एलॉन मस्क यांनी 44 कोटी डॉलरना ट्विटर खरेदी करण्याचं डील नक्की केलं होतं. मात्र त्यांनी आता त्यातून माघार घेतली आहे. याविरोधात ट्विटरने कोर्टात धाव घेतली असून मस्क यांच्या माघारीला आव्हान दिलं आहे. एकदा ठरवलेला आणि कागदोपत्री निश्चित केलेला सौदा मस्क रद्द करू शकत नाहीत, असा दावा ट्विटरने कोर्टात केला आहे. ट्विटरने एलॉन मस्क यांची कंपनी असणाऱ्या टेस्लावर दावा दाखल केला आहे, तर दुसरीकडे मस्क यांनी काहीतरी गैरसमज झाल्याचा दावा केला आहे. ट्विटरने आपल्याबाबत चुकीची माहिती प्रसारित केली आहे, असा आरोप मस्क यांनी केला आहे. आता ट्विटर विरुद्ध मस्क या वादात आनंद महिंद्रांनी उडी घेतली असून हा वाद म्हणजे निरर्थक वेळ वाया घालवण्याचा प्रकार असल्याची टीका केली आहे. या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 

अधिक वाचा - भारतातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण केरळमध्ये

काय म्हणाले महिंद्रा?

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा आणि ट्विटर आणि एलॉन मस्क यांच्यात सुरू असलेल्या वादावर टीका केली आहे. What a waste of time, energy असं ट्विट त्यांनी केलं आहे. याचाच अर्थ सध्या सुरू असणारा प्रकार हा पैसे, वेळ आणि ऊर्जा या तिन्ही गोष्टी वाया घालवणं होय, असं महिंद्रा यांना म्हणायचं आहे. ट्विटर ही एक माहितीचं आणि मतांचं आदानप्रदान करणारी कंपनी आहे. तिचा विचार केवळ फायद्यातोट्यांच्या गणिताच्या आधारे कसा काय केला जाऊ शकतो, असा सवाल महिंद्रा यांनी केला आहे. 

अधिक वाचा - Murder for friendship : दोस्तीसाठी खून! अगोदर मित्रावर केले चाकूचे वार, मग संपवलं स्वतःचं आयुष्य

महिंद्रा सोशल मीडियात लोकप्रिय

आनंद महिंद्रा हे सोशल मीडियात सतत ॲक्टिव्ह असतात आणि वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं नोंदवत असतात. ट्विटरवर त्यांचे 94 लाख फॉलोअर्स आहेत. त्यांनी टाकलेली प्रत्येक पोस्ट प्रचंड वेगाने व्हायरल होत असते. आपल्या अकाउंटवरून प्रेरणात्मक संदेश ते नेहमी पोस्ट करत असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी