बिर्ला कुटुंबियांसोबत USमध्ये वंशभेद!  रेस्टॉरंटमधून माझ्या कुटुंबाहेर बाहेर काढले, अनन्या बिर्लाचे ट्विट

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 26, 2020 | 13:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

ananya birla: नीरजा बिर्ला यांचा मुलगा आणि क्रिकेटर आर्यमान बिर्ला यानेही ट्वीट करत हा खराब अनुभव असल्याचे सांगितले. त्याने सांगितले जगात अद्यापही वंशभेद सुरू आहे आणि हे सत्य आहे. 

ananya birla
बिर्ला कुटुंबियांसोबत USमध्ये वंशभेद! अनन्या बिर्लाचे ट्वीट 

थोडं पण कामाचं

  • बिर्ला कुटुंबियांसोबत अमेरिकेत वंशभेद
  • अनन्या बिर्लाने ट्वीट करून दिली माहिती
  • अनन्याच्या ट्विटवर अनेकांच्या प्रतिक्रिया

मुंबई: देशातील प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला(kumar mangalam birla) यांच्या कुटुंबियांसोबत वंशभेद(racism) झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. बिर्ला कुटुंबियांसोबत(birla family) ही घटना अमेरिकेच्या(washington in us) वॉशिंग्टनमध्ये झाली. कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्ला(ananya birla) यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. अनन्या बिर्लाने ट्वीटमध्ये लिहिले की या रेस्टॉरट स्कोपा इटालियन रूट्सने मला आणि माझ्या कुटुंबियांना आपल्या परिसरातून बाहेर काढले. हा वंशभेद खरच दु:खी करणारा आहे. तुमच्या तुमच्या ग्राहकांसोबत योग्य पद्धतीने वागले पाहिजे. हे योग्य नाही. 

आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्य अनन्याने लिहिले की आम्ही रेस्टॉरंटमध्ये खाण्यासाठी तीन तास वाट पाहिली. शेफ अँटोनियो तुमचे वेटर जोशुआ सिल्वरमॅन यांची माझ्या आईसोबत वागणूक खूपच कठोर होती. याला वंशभेद म्हटले जाऊ शकते. हे योग्य नव्हे. 

कुमार मंगलम बिर्ला यांची पत्नी आणि अनन्या बिर्लाची आई नीरजा बिर्लानेही ट्वीट करत ही घटना खूपच हैराणजनक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी लिहिले की रेस्टॉरंटला कोणत्याही ग्राहकाला अशी वागणूक देण्याचा कोणताही अधिकार नाही. 

नीरजा बिर्ला यांचा मुलगा आणि क्रिकेटर आर्यमान बिर्लानेही या प्रकरणी ट्वीट करत अत्यंत खराब अनुभव असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर युजर्स अनन्या बिर्लाच्या या ट्विटवर चांगल्याच प्रतिक्रिया देत आहेत. अनेक सेलिब्रेटीजनीही अनन्या बिर्लाच्या या ट्वीट्लवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता करणवीर वोहराने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की 'अनन्या बिर्ला हे खूपच वाईट आहे की तुला आणि तुझ्या कुटुंबियांना या स्थितीतून जावे लागले. ही रेस्टॉरंटसाठी शरमेची बाब आहे.' तर अभिनेता रणविजय सिंहनेही यावर प्रतिक्रिया देताना लिहिले की 'यावर विश्वास बस नाहीये. हे योग्य नाही. '

कोण आहे अनन्या बिर्ला

अनन्या बिर्ला आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आणि गायिका आहे. अनन्या बिर्लाचे पहिले गाणे लिविन द लाईफ २०१६मध्ये आले होते. या गाण्यानंतर तिला युनिर्व्हसल म्युझिक इंडियाने सिंगर म्हणून साईन केल होते. याशिवाय ति ई कॉमर्स कंपनी क्युरोकार्टचीही फाऊंडर तसेच सीईओ आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी