चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा पुत्र नजरकैदेत, TDPचे कार्यकर्ते ताब्यात

टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारा लोकेशला नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या राहत्या घरी स्थानबद्ध केलं आहे. नायडू हे सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत उपोषण करणार आहेत. 

TDP Chief N Chandrababu Naidu
चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा पुत्र नजरकैदेत, TDPचे कार्यकर्ते ताब्यात  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • तेलुगु देसम पार्टी (टीडीपी)  चे प्रमुख आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारा लोकेश यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.
  • आंध्रप्रदेशमध्ये टीडीपी नेत्याच्या हत्येविरोधात आज माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आंदोलन करणार होते.
  • पोलिसांनी टीडीपी प्रमुख आणि त्यांच्या मुलाला त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच अमरावतीमधल्या घरात नजरकैदेत ठेवलं आहे.
  • नायडूचा यांचा मुलगा टीडीपीचे सरचिटणीस आणि एमएलसी नारा लोकेश यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आहे. 

तेलुगु देसम पार्टी (टीडीपी)  चे प्रमुख आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारा लोकेश यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशमध्ये टीडीपी नेत्याच्या हत्येविरोधात आज माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आंदोलन करणार होते. दरम्यान पोलिसांनी टीडीपी प्रमुख आणि त्यांच्या मुलाला त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच अमरावतीमधल्या घरात नजरकैदेत ठेवलं आहे. यावेळी नायडूचा यांचा मुलगा टीडीपीचे सरचिटणीस आणि एमएलसी नारा लोकेश यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आहे. 

रिपोर्ट्सनुसार, टीडीपी प्रमुखांनी नजरकैदेत ठेवण्यात आल्यानंतर आज आपल्या घरी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. नायडू यांच्या घोषणेनंतर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते त्यांच्या घरी जात होते. मात्र पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना थांबवलं असून ताब्यात घेतलं आहे. 

माहितीच्या आधारावर पोलिसांनी विजयवाडामध्ये आंध्रप्रदेशचे माजी मंत्री आणि तेदेपा नेते भूमा अखिला प्रिया यांना नोवोटेल हॉटेलमध्ये पोलिसांनी प्रतिबंधात्मक ताब्यात घेतलं आहे. आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात टीडीपीचे माजी आमदार तांगीराला सौम्या यांना नंदीगामा शहरातल्या त्यांच्या घरातून अटक केली आहे. 

याव्यतिरिक्त आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात टीडीपी एमएलसी वायवीबी राजेंद्र प्रसाद यांना सुद्धा उयुरूमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं. अय्यन्ना पत्रादू यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. विशाखापट्टणम पूर्वचे आमदार वेलागपुडी रामकृष्ण बाबू आणि माजी आमदार पीला गोविंद यांना अटक केली असून पुन्नामी गेस्ट हाऊस येथे पाठवण्यात आलं आहे. 

सौम्या आणि अन्य टीडीपी नेते पक्ष कार्यकर्त्यासोबत सरकारविरोधात चलो आत्मकुरू रॅलीचं आयोजन केलं होतं. सरकारनं या रॅलीला परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला. ही रॅली आज गुंटूरमधील पलनाडू येथे आयोजित करण्यात आली होती. वायएसआरसीपी सरकार राजकीय हिंसाचार करत असल्याचं म्हणत या हिंसाचाराविरोधात आपली रॅली असल्याचं चंद्राबाबू  यांनी जाहीर केलं होतं. पोलिसांनी या रॅलीला  परवानगी नाकारली होती. तसंच नरसरावपेटा, सत्तेनापल्ले, पलनाडू आणि गुराजलामध्ये कलम १४४ लागू करत जमावबंदी लागू केली. या व्यतिरिक्त पोलिसांनी राज्यातील टीडीपीचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...