Stampede at chandrababu naidu roadshow: आंध्रप्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आंध्रप्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातील कुंदुकुर येथे टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शो दरम्यान चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Andhra Pradesh stampede at chandrababu naidu roadshow reports of 8 dead and many injured)
मिळालेल्या माहितीनुसार, टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचा एक रोड शो सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. तेलुगू देसम पार्टीचा नेल्लोर येथे रोड शो सुरू होता आणि त्यावेळी ही घटना घडली. या दुर्घटनेनंतर चंद्राबाबू नायडू यांच्या एनटीआर ट्रस्टकडून मृतकांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत घोषित केली आहे. तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही उचलणार असल्याचं जाहीर केलं आहे.
#BREAKING — TIMES NOW (@TimesNow) December 28, 2022
Andhra Pradesh: 8 people die in a stampede during TDP chief N Chandrababu Naidu's rally in Nellore. Several more are seriously injured.
Rs.10 lakh Ex-gratia announced by the TDP for the families of the deceased.@sowmith7 shares latest details with @PadmajaJoshi. pic.twitter.com/27wmEodn5M
विधानसभेचे विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू हे नेल्लोर येथे एक रोड शो करत होते. यावेळी घटनास्थळी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रचंड गर्दी होती आणि ज्या ठिकाणी चंद्राबाबू सभेला संबोधित करणार होते त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केला याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली.
हे पण वाचा : फाटलेल्या नोटा बदलून घेण्याचं नका घेऊ टेन्शन, या ठिकाणी करा एक्सचेंज
या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर चंद्राबाबू नायडू यांनी आपली सभा तात्काळ रद्द केली तसेच मृतकांच्या कुटुंबीयांना 10-10 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली.
टीडीपीचे राष्ट्रीय महासचिव आणि नायडू यांचे चिरंजीव नारा लोकेश यांनी ट्विट करत म्हटलं, टीडीपी कार्यकर्त्यांच्या निधानाने एक मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रती माझ्या मनापासून संवेदना. जखमींवर उत्तम उपचार व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत.