Anti Covid Pills: कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी हाती आलं नवं शस्त्र; लवकरच येणार ‘मेड इन इंडिया’ अँटी कोविड गोळ्या

Anti Covid Pills:  कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने (second wave) देशात कहर माजवला होता. रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी बेड कमी पडत होते. त्यानंतर प्रशासनाने लसीकरणावर जोर देत कोरोनाच्या युद्धात कोरोनाला दोन पाऊल मागे केले आहे.

Coming soon ‘Made in India’ anti covid pills
लवकरच येणार ‘मेड इन इंडिया’ अँटी कोविड गोळ्या  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मर्कचे अँटीव्हायरल औषध ‘मोल्नुपिरावीर’ (molnupiravir) कोरोनाची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना दिले जाईल.
  • कोरोनाच्या उपचारात उपयुक्त मानली जाणारी गोळी ‘मर्क’ नावाच्या औषध कंपनीने विकसित केली आहे.
  • ऑक्टोबर २०२१ मध्येच इंग्लंडच्या आरोग्य विभागाने या अँटी कोविड गोळ्यांचा साठा 4 लाख ८० हजारपर्यंत केला होता.

Anti Covid Pills:  नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने (second wave) देशात कहर माजवला होता. रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी बेड कमी पडत होते. त्यानंतर प्रशासनाने लसीकरणावर जोर देत कोरोनाच्या युद्धात कोरोनाला दोन पाऊल मागे केले आहे. कोरोनाची अजून पीछेहाट करण्यासाठी देशाला नवे शस्त्र मिळणार आहे. हे शस्त्र आहे गोळी, जी कोरोना रूग्णांना (Corona patients) दिली जाणार आहे. ही गोळी घेतल्यानं कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी होणार आहे. मर्कचे  (Merck's) अँटीव्हायरल औषध (Antiviral Drug) ‘मोल्नुपिरावीर’ (Molnupiravir) कोरोनाची सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी काही दिवसांत आपत्कालीन वापरासाठी मंजूर केले जाईल. 

हे औषध प्रौढांसाठी आहे, ज्यांना कोरोनाची गंभीर लक्षणे आहेत किंवा ज्यांना रुग्णालयात दाखल करण्याची भीती वाटत आहे. त्यांन दिले जाईल, असे डॉ राम विश्वकर्मा (Dr. Ram Vishwakarma), अध्यक्ष, कोविड स्ट्रॅटेजी ग्रुप (Chairman, Covid Strategy Group), सीएसआयआर (CSIR)यांनी सांगितले.
दरम्यान या अँटी कोविड (Anti Covid Pills) गोळ्यांसाठी आधी इंग्लंडने मंजुरी दिली होती, आता भारतातील रुग्णांनाही या अँटी कोविड गोळ्या दिल्या जाणार आहेत. ऑक्टोबर २०२१ मध्येच इंग्लंडच्या आरोग्य विभागाने 4 लाख ८० हजार गोळ्यांचा साठा केला होता. या साठ्यात वाढ केली जात आहे.

भारतातील स्थितीविषयी माध्यामांशी बोलताना कोविड स्ट्रॅटेजी ग्रुप डॉ. राम विश्वकर्मा यांनी सांगितले की, फायझरच्या गोळी पॅक्सलोव्हिडसाठी थोडा वेळ लागू शकतो. या दोन औषधांच्या येण्याने चांगला परिणाम होईल. कोरोना महामारीशी लढण्यासाठी लसीकरणापेक्षा त्या अधिक प्रभावी ठरतील. “मला वाटतं मोल्नुपिरावीर लवकरच उपलब्ध होईल. अशा पाच कंपन्या आहेत, ज्या औषध निर्मात्यांसोबत काम करत आहेत. मला वाटते की अशा परिस्थितीत, आपल्याला त्या कधीही वापरण्याची परवानगी मिळू शकते,” असे डॉ राम विश्वकर्मा म्हणाले. तर फायझरने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या औषधामुळे कमकुवत रूग्णांमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची शक्यता किंवा मृत्यूचा धोका ८९ टक्क्यांपर्यंत कमी होतो.

मर्क कंपनीने आधीच पाच कंपन्यांशी करार केला आहे आणि मर्कने अनेक कंपन्यांना परवाना दिला आहे. फायझर देखील तेच करेल कारण त्यांना जागतिक वापरासाठी आवश्यक औषधे तयार करण्यासाठी भारतीय कंपन्या वापराव्या लागणार आहेत. कोरोनाच्या उपचारात उपयुक्त मानली जाणारी ही गोळी ‘मर्क’ नावाच्या औषध कंपनीने विकसित केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी