आसाममध्ये मिळाले प्राचीन जार, इंडोनेशिया आणि लाओसशी संबंध

Archaeologists Found Mysterious Jars In Assam Like Indonesia : भारतात आसाममध्ये मोठ्या आकाराची मातीची भांडी मिळाली आहेत. हे मातीचे प्राचीन जार आहेत. विशेष म्हणजे अशाच स्वरुपाचे मातीचे जार इंडोनेशिया आणि लाओस या दोन देशांमध्येही सापडले आहेत. 

Archaeologists Found Mysterious Jars In Assam Like Indonesia
आसाममध्ये मिळाले प्राचीन जार, इंडोनेशिया आणि लाओसशी संबंध  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आसाममध्ये मिळाले प्राचीन जार, इंडोनेशिया आणि लाओसशी संबंध
  • अभ्यासकांच्या मते जार इसवी सन पूर्व ४०१ च्या सुमाराचे
  • जारचा वापर कोणकोणत्या हेतूने सुरू होता हे समजून घेण्याचे प्रयत्न सुरू

Archaeologists Found Mysterious Jars In Assam Like Indonesia : नवी दिल्ली : भारतात आसाममध्ये मोठ्या आकाराची मातीची भांडी मिळाली आहेत. हे मातीचे प्राचीन जार आहेत. विशेष म्हणजे अशाच स्वरुपाचे मातीचे जार इंडोनेशिया आणि लाओस या दोन देशांमध्येही सापडले आहेत. 

Maharashtra Day 2022 in Marathi : म्हणून १ मे रोजी संयुक्त महाराष्ट्र दिन साजरा केला जातो, जाणून घ्या इतिहास

आसाममध्ये आढळलेले जार २०२० पासून मिळण्यास सुरुवात झाली. अभ्यासकांच्या मते हे जार इसवी सन पूर्व ४०१ च्या सुमाराचे आहेत. नागा समाजात लोकप्रिय असलेल्या काही कथांमध्ये आसाममध्ये आढळलेल्या जार सारख्या मोठ्या भांड्यांचे उल्लेख आढळतात. या जारमध्ये द्रव पदार्थ अथवा मोती अथवा इतर मौल्यवान पदार्थ साठविले जात असल्याचे उल्लेख कथांमध्ये आहेत. सध्या या प्राचीन जारवर भारत आणि ऑस्ट्रेलियातील तीन विद्यापीठांचे इतिहासतज्ज्ञ संशोधन करत आहेत.

भारतात आसामच्या जंगलात आढळलेले जार हे मातीत रुतले आहेत. आधी घनदाट जंगलामुळे हे जार कोणाला दिसले नव्हते. पण झाडं कापल्यामुळे जंगलाचा काही भाग उघडा पडला आणि पहिल्यांदा जार दृष्टीस पडले. आतापर्यंत दहा ठिकाणी मिळून ७०० जार आसाममध्ये आढळले आहेत. मेघालयमध्येही जार आढळले आहेत.

आसाम आणि मेघालय येथे आढळलेल्या जार सारखे दिसणारे जार  इंडोनेशिया आणि लाओस या दोन देशांमध्येही सापडले आहेत. लाओसमध्ये पहिला जार २०१६ मध्ये सापडला होता. 

भारत, लाओस आणि इंडोनेशिया या तिन्ही देशांत आढळलेल्या जारमध्ये काही बाबतीत साम्य आढळले आहे. तज्ज्ञांच्या मते भारतात जार असलेली आणखी काही ठिकाणं असतील. या दृष्टीने संशोधन सुरू आहे. 

विशिष्ट भागात थोड्या थोड्या अंतरावर जार आढळत आहेत. यामुळे जार वापरण्यामागची कारणे शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. जार ज्या काळातील आहेत त्यावेळचा समाज आणि त्याचे जीवनमान याचा अभ्यास करुन जारचा वापर कोणकोणत्या हेतूने सुरू होता हे समजून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

सापडत असलेले जार आज रिकामे आहेत पण एकेकाळी ते नक्की कशाने तरी भरले असावेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जारचा वापर नेमका कोणकोणत्या घटकांची साठवणूक करण्यासाठी होत यावर संशोधन सुरू आहे. भारतात जार संदर्भात जे संशोधन सुरू आहे त्याचे नेतृत्व नॉर्थ इस्टर्न हिल विद्यापीठाचे तिलोक ठकुरिया करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी