Taj Mahal : ताजमहालच्या तळघरात हिंदू देव-देवतांच्या मूर्ती आहेत का? RTI मधून पुरातत्व विभागानं दिली धक्कादायक माहिती

काही दिवसांपासून मशीद ताजमहलचा वाद होत आहे. ताज महल हे शिवमंदिर असून त्याच तळमजले खुले करून त्यातील सत्य बाहेर आणावीत, अशी मागणी केली जात होती. या गोष्टीला मुस्लीम समुदायाकडून जबरदस्त विरोध केला जात होता. दरम्यान, परंतु पुरातत्व विभागाने एका आरटीआयच्या माध्यमातून एक धकादायक माहिती समोर आणली आहे.

idols of Hindu deities in the basement of Taj Mahal?
ताजमहालच्या तळघरात हिंदू देव-देवतांच्या मूर्ती आहेत का?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ताजमहाल मंदिराच्या जागेवर बांधला गेला नाही. ताजमहालच्या तळघरांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती नाहीत.
  • तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनी आरटीआय दाखल केला होता.

नवी दिल्ली : काही दिवसांपासून मशीद ताजमहलचा वाद होत आहे. ताज महल हे शिवमंदिर असून त्याच तळमजले खुले करून त्यातील सत्य बाहेर आणावीत, अशी मागणी केली जात होती. या गोष्टीला मुस्लीम समुदायाकडून जबरदस्त विरोध केला जात होता. दरम्यान, परंतु पुरातत्व विभागाने एका आरटीआयच्या माध्यमातून एक धकादायक माहिती समोर आणली आहे. ताजमहालला शिवमंदिर म्हणणारे वाद मांडत आहेत तर दुसरीकडे ताजमहालला समाधी म्हणणारे लोक आहेत. तर आता भारताच्या पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार, ताजमहाल मंदिराच्या जागेवर बांधला गेला नाही. ताजमहालच्या तळघरांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती नाहीत. एएसआयने एका आरटीआयच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. 12 मे रोजी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांनी आरटीआय दाखल केला होता. 

एएसआयकडून दोन प्रश्नांची माहिती

या याचिकेत त्यांनी एएसआयकडून दोन प्रश्नांची माहिती मागितली होती. पहिल्या प्रश्नात त्यांनी ताजमहालच्या जमिनीवर मंदिर नसल्याचा पुरावा मागितला होता, तर दुसरा प्रश्न तळघरातील 20 खोल्यांमध्ये असलेल्या हिंदू देव-देवतांच्या मूर्तींशी संबंधित होता. यावर एएसआयने एका ओळीत उत्तर दिले. ASI चे जनसंपर्क अधिकारी महेश चंद मीना यांनी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात फक्त 'नाही' असे लिहिले आहे. दुसर्‍याच्या प्रतिसादात, "तळघरात हिंदू देव-देवतांची मूर्ती नाही" असे लिहिले आहे.

आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी पोस्टमध्ये म्हटलंय,  भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मला सांगतो की, ते अधिकृत आहे.
A. ताजमहाल मंदिराच्या जागेवर बांधला गेला नाही.
B. ताजमहालच्या आत "मूर्ती असलेले कुलूपबंद कक्ष" नाहीत.
आशा आहे की, लोक आणि न्यायालये याची दखल घेतील. भाजप, हिंदुत्व गट आणि नोएडा प्रसारमाध्यमांचा हा मुद्दा म्हणून वापरून तणाव निर्माण करण्याच्या दुष्ट मनसुब्यांना खोडून काढतील.

हिंदू संघटनांचा दावा

यापूर्वी हिंदू संघटनांनी ताजमहालचे वर्णन तेजो महालय मंदिर असे करून ताजमहालच्या बंद खोल्यांमध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा केला होता. अशा दाव्यांनंतर हे प्रकरण झपाट्याने चर्चेत आले. त्याचवेळी अयोध्येतील एका भाजप नेत्याने उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात तळघरे उघडण्यासाठी याचिका दाखल केली होती, त्यानंतर न्यायालयाने ती फेटाळली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी