अर्जेंटिना भारताकडून तेजस लढाऊ विमान खरेदी करणार

Argentina shows interest in Indian Tejas fighter aircraft and want to trade in local currencies : तेजस हे भारतात तयार केलेले हलक्या वजनाचे लढाऊ विमान आहे. हे विमान आपापल्या हवाई दलासाठी खरेदी करण्याकरिता मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि अर्जेंटिना हे चार देश उत्सुक आहेत.

Argentina shows interest in Indian Tejas fighter aircraft and want to trade in local currencies
अर्जेंटिना भारताकडून तेजस लढाऊ विमान खरेदी करणार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अर्जेंटिना भारताकडून तेजस लढाऊ विमान खरेदी करणार
  • मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि अर्जेंटिना हे चार देश LCA तेजस खरेदी करण्यास उत्सुक
  • भारताचे परराष्ट्रमंत्री अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर असताना LCA तेजस संदर्भात झाली बोलणी

Argentina shows interest in Indian Tejas fighter aircraft and want to trade in local currencies : तेजस हे भारतात तयार केलेले हलक्या वजनाचे लढाऊ विमान आहे. हे विमान आपापल्या हवाई दलासाठी खरेदी करण्याकरिता मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि अर्जेंटिना हे चार देश उत्सुक आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे चारही देश डॉलर ऐवजी भारतीय रुपयांच्या स्वरुपात पैसे देऊन तेजस विमान खरेदी करण्यास उत्सुक आहेत. 

जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते
विमान प्रवासादरम्यान चुकूनही करू नका 'या' गोष्टी, अन्यथा...
तुम्हीही डिजिटल पेमेंट करता? मग ही बातमी वाचाच....

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर दोन दिवसांच्या अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात तेजस या लढाऊ विमानाबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. लवकरच पुढील टप्प्याची चर्चा होणार आहे. अर्जेंटिना भारतासोबत संरक्षण, अणुऊर्जा, अंतराळ संशोधन या क्षेत्रांमध्ये सहकार्य करार करण्यास तसेच भारताकडून तेजस हे लढाऊ विमान खरेदी करण्यास उत्सुक आहे. 

हलक्या वजनाची लढाऊ विमानं बॉम्ब हल्ले, क्षेपणास्त्र हल्ले, रॉकेट हल्ले करण्यासाठी वापरली जातात. आकाशातून आकाशात, आकाशातून पाण्यावर वा पाण्यात  आणि आकाशातून जमिनीवर हल्ले करण्यासाठी हलक्या वजनाच्या लढाऊ विमानांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अचूक लक्ष्यभेद करणे तसेच वेगाने हालचाली करून शत्रूच्या हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करणे या दोन उद्देशांना साध्य करण्यासाठी हलक्या वजनाची लढाऊ विमानं वापरली जातात. 

एकदा इंधन भरून दीर्घ काळ न थांबता उड्डाण करण्याची क्षमता, वेग, सोपी हाताळणी आणि स्वतःचे रक्षण करण्याचे सामर्थ्य यामुळे तेजस हे हलक्या वजनाचे लढाऊ विमान अतिशय प्रभावी झाले आहे. तेजस या विमानाने त्याच्या श्रेणीतील चीनच्या विमानाला मागे टाकले आहे. यामुळे तेजस या विमानाला हळू हळू मागणी येऊ लागली आहे.

भारताचे तेजस हे एक हलक्या वजनाचे लढाऊ विमान आहे. हे विमान एक प्रभावी इंजिन असलेले आणि अनेक उद्दिष्टे साध्य करणारे लढाऊ विमान आहे. हे विमान सहजपणे रडारमध्ये आढळत नाही. यामुळे शत्रूपासून स्वतःचे रक्षण करून हल्ला करण्यात हे विमान कमालीचे यशस्वी ठरत आहे. तेजस या विमानाला उड्डाण करण्यासाठी फक्त ४६० मीटर लांबीची धावपट्टी पुरेशी आहे. याच कारणामुळे तेजस हे लढाऊ विमान जमिनीवरून तसेच अनेक युद्धनौकांवरून सहज उड्डाण करू शकते. आकाशातल्या आकाशात इंधन भरून घेऊन दीर्घ काळ उड्डाण करत राहण्याची क्षमता या विमानात आहे. 

शत्रूचे रणगाडे नष्ट करणारी अँटी टँक मिसाइल तसेच इतर अनेक प्रभावी शस्त्रे घेऊन तेजस हे लढाऊ विमान सहज उड्डाण करू शकते. काही बाबतीत सुखोई या लढाऊ विमानाच्या तोडीस तोड शस्त्रे घेऊन उड्डाण करणे तेजस या विमानाला शक्य आहे.

भारताने २०१६ मध्ये तेजस या लढाऊ विमानाची पहिली स्क्वाड्रन देशाच्या वायु दलात (हवाई दल) दाखल करून घेतली. भारताच्या वायु दलाने ८६ तेजस विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही ऑर्डर हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited - HAL) ही भारतीय कंपनी पूर्ण करत आहे. ही ऑर्डर पूर्ण होण्याआधीच चार देशांनी तेजस विमान खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखविली आहे. अर्जेंटिना सरकारने तर भारत सरकारशी तेजस विमान खरेदी करण्यासाठी बोलणी सुरू केली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर असतानाच बोलणी सुरू झाली आहेत. बोलणी यशस्वी झाली तर भारत पहिल्यांदाच लढाऊ विमानांची निर्यात करेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी