जाणून घ्या, कसे आहे भारताचे हलके लढाऊ हेलिकॉप्टर

Armed forces to get Made-in-India light combat helicopter today - all you need to know about twin-engine LCH उत्तर प्रदेशमधील झांसी येथे राष्ट्र रक्षा समर्पण पर्व (Rashtra Raksha Samparpan Parv) या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिकात्मक पद्धतीने भारताच्या सशस्त्र दलांना हलके लढाऊ हेलिकॉप्टर (Light Combat Helicopter - LCH) सुपूर्द करतील.

Armed forces to get Made-in-India light combat helicopter today - all you need to know about twin-engine LCH
जाणून घ्या, कसे आहे भारताचे हलके लढाऊ हेलिकॉप्टर 
थोडं पण कामाचं
 • जाणून घ्या, कसे आहे भारताचे हलके लढाऊ हेलिकॉप्टर
 • दोन इंजिन असलेले हलके लढाऊ हेलिकॉप्टर, पाच ते आठ टन वजन वाहून नेण्यास सक्षम असलेले हेलिकॉप्टर.
 • हेलिकॉप्टर १५ ते १६ हजार फूट उंचीवरुन सहज उडू शकते

Armed forces to get Made-in-India light combat helicopter today - all you need to know about twin-engine LCH नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील झांसी येथे राष्ट्र रक्षा समर्पण पर्व (Rashtra Raksha Samparpan Parv) या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिकात्मक पद्धतीने भारताच्या सशस्त्र दलांना हलके लढाऊ हेलिकॉप्टर (Light Combat Helicopter - LCH) सुपूर्द करतील. तसेच पंतप्रधान स्वदेशी मानवविरहीत विमान (Unmanned Aerial Vehicles - UAV) आणि लढाईसाठी आधुनिक इलेक्ट्रॉनिक सुट (advanced electronic warfare suites) सशस्त्र दलांना सुपूर्द करतील. हा कार्यक्रम आज (शुक्रवार १९ नोव्हेंबर २०२१) होईल. या व्यतिरिक्त पंतप्रधान झांसी तसेच महोबा येथील अनेक विकास योजनांचे उद्घाटन करतील. यामुळे बुंदेलखंडचा मोठा फायदा होईल. यात पाणी टंचाईची समस्या सोडविणाऱ्या एका मोठ्या प्रकल्पाचाही समावेश आहे.

पंतप्रधान सशस्त्र दलांना सोपविणार असलेले हलके लढाऊ हेलिकॉप्टर हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics - HAL) या कंपनीने तयार केले आहे. जाणून घेऊ या हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये...

स्वदेशी एलसीएचची वैशिष्ट्ये: 

 1. दोन इंजिन असलेले हलके लढाऊ हेलिकॉप्टर, पाच ते आठ टन वजन वाहून नेण्यास सक्षम असलेले हेलिकॉप्टर. हे हेलिकॉप्टर १६ हजार ४०० फूट उंचीवरुन आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज अशा स्थितीत उड्डाण करण्यास तसेच या उंचीवर सशस्त्र असताना सहज उतरण्यास सक्षम आहे.
 2. हेलिकॉप्टर १५ ते १६ हजार फूट उंचीवरुन सहज उडू शकते.
 3. बर्फाळ प्रदेशातील उणे ५० अंश से. ते वाळवंटातील ५० अंश से. अशा टोकाच्या वातावरणातही हे हेलिकॉप्टर पूर्ण क्षमतेने काम करू शकते.
 4. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे हे हेलिकॉप्टर.
 5. २० मिमी. ची बंदूक आणि ७० मिमी. चे रॉकेट तसेच आधुनिक क्षेपणास्त्र यांनी सुसज्ज आहे हेलिकॉप्टर.
 6. आधुनिक रडारच्या मदतीने शत्रूच्या हालचालींचा अचूक वेध घेऊन हल्ला करण्याची आणि हल्ल्यानंतरची शत्रूची स्थिती जाणून घेण्याची क्षमता. 
 7. वैमानिकाकरवी आणि स्वयंचलित पद्धतीने अशा दोन्ही प्रकारे हल्ल्याची क्षमता.
 8. हेलिकॉप्टर १८० अंशांच्या कोनात स्थिर राहू शकते तसेच ३६० अंशांच्या कोनात वेगाने फिरू शकते. गरजेप्रमाणे संपूर्ण हेलिकॉप्टर उलटेपालटे करणे शक्य आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी