Jammu Kashmir: आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ड्रोनमधून शस्त्रास्त्रांची वाहतूक; पाकिस्तानी ड्रोनमधून आला शस्त्रास्त्र आणि दारूगोळा, हत्यारं पोलिसांकडून जप्त

आंतरराष्ट्रीय सीमेजवळील (international border) टोफ गावात (Tof village) पाकिस्तानी ड्रोनने (Pakistani drone) शस्त्रे (Weapons) आणि दारूगोळा टाकण्यात आली होती. हे शस्त्र जम्मू-काश्मीर पोलिसांकडून (Jammu and Kashmir Police) जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारी 2022 रोजी पाकिस्तानी ड्रोनने (drone)टाकलेल्या शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्याप्रकरणी अर्निया पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 Arms dropped by Pakistani drone near international border
आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोनमधून आले शस्त्रास्त्र   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 24 फेब्रुवारी 2022 रोजी पाकिस्तानी ड्रोनने (drone)टाकलेल्या शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्याप्रकरणी अर्निया पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  • आरोपीला कारागृहातून न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

जम्मू: आंतरराष्ट्रीय सीमेजवळील (international border) टोफ गावात (Tof village) पाकिस्तानी ड्रोनने (Pakistani drone) शस्त्रे (Weapons) आणि दारूगोळा टाकण्यात आली होती. हे शस्त्र जम्मू-काश्मीर पोलिसांकडून (Jammu and Kashmir Police) जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 फेब्रुवारी 2022 रोजी पाकिस्तानी ड्रोनने (drone)टाकलेल्या शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्याप्रकरणी अर्निया पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  जम्मूशी संबंधित एका आरोपीने खुलासा केला होता की पाकिस्तानी कैदी/हँडलर, मोहम्मद अली हुसैन उर्फ ​​कासिम, याने ड्रोन खाली पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि तो लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि अल बद्रचा मुख्य कार्यकर्ता आहे.

पोलिसांच्या चौकशीत झाला खुलासा

आरोपीला कारागृहातून न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, सतत चौकशीदरम्यान, आरोपीने अर्निया शस्त्रास्त्र सोडल्याप्रकरणी आपल्या भूमिकेची कबुली दिली आणि ड्रोनद्वारे सोडलेली शस्त्रे आणि दारूगोळा कुठे लपवून ठेवला होता हे देखील सांगितले केले. दरम्यान, शस्त्र जप्त करण्यासाठी संबंधित दंडाधिकार्‍यांसह पोलिस पथक घटनास्थळी गेले होते.

दहशतवाद्याचा पळून जाण्याचा प्रयत्न

अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंग म्हणाले, “पहिल्या ठिकाणी कोणतीही पुनर्प्राप्ती झाली नसली तरी फालियन मंडल भागातील टोफ गावात (आंतरराष्ट्रीय सीमेजवळ) दुसर्‍या ठिकाणी शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटकांची पाकिटे आढळले. पाकीट उघडत असताना आरोपींनी एका पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला करून त्याची सर्व्हिस रायफल हिसकावून घेतली. त्याने पोलिस दलावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

हे शस्त्र मिळाले

"गोळीबाराला प्रत्युत्तर देताना आरोपी जखमी झाला आणि जखमी पोलीस अधिकाऱ्यासह त्याला जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले," असे अधिकारी म्हणाले. जखमी दहशतवाद्याचा नंतर मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी बॉम्ब निकामी पथकाच्या मदतीने टाकलेल्या पॅकेटची तपासणी केली. पाकिटातून एक एके रायफल, मॅगझीन, 40 एके राऊंड, एक स्टार पिस्तूल, पिस्तुल राऊंड आणि चिनी छोटे ग्रेनेड जप्त करण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी