लष्करानं १३ दिवसात घेतला बँक मॅनेजर विजय कुमारच्या हत्येचा बदला;शोपियामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

 जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir)सुरक्षा दलांचे ऑपरेशन ऑलआऊट (Operation All-Out) सुरू आहे. या मोहिमेच्या अंतर्गत मंगळवारी रात्री उशिरा शोपियानमध्ये (Shopiana) झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

Two Lashkar-e-Taiba militants killed in Shopia
शोपियामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शोपियामध्ये झालेल्या चकमकीत सैन्याने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले
  • दोन्ही दहशतवादी ‘लष्कर-ए-तैयबा’चे सदस्य होते, यातील एकाचे नाव मोहम्मद लोन असं आहे.

श्रीनगरः  जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir)सुरक्षा दलांचे ऑपरेशन ऑलआऊट (Operation All-Out) सुरू आहे. या मोहिमेच्या अंतर्गत मंगळवारी रात्री उशिरा शोपियानमध्ये (Shopiana) झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कर जवानांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत शोपियानच्या कांजीउलर भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना मोठं यश मिळालं आहे. दरम्यान हे दहशतवादी बँक मॅनेजरच्या हत्येमध्ये सहभागी होते.

कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी राजस्थानचे रहिवासी असलेल्या विजय कुमार या बँक व्यवस्थापकाची बँकेतच गोळ्या झाडून हत्या केली होती. अखेर विजयच्या हत्येचा बदला घेण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. शोपियामध्ये झालेल्या चकमकीत सैन्याने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. कुलगाम जिल्ह्यातील बँकेचे मॅनेजर विजयकुमार यांची काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी हत्या केली होती. विजयकुमारच्या हत्येनंतर अस्वस्थ झालेल्या काश्मीरी पंडितांनी काश्मीर खोरे सोडण्याचा निर्णय घेतला होता. मोठ्या प्रमाणात काश्मीरी पंडित व कर्मचारी जम्मूत परतले होते. शोपिया जिल्ह्यातील परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर या भागाला जवानांनी वेढा दिला. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांच्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी मारले गेले. 

हे दोघेही ‘लष्कर-ए-तैयबा’चे दहशतवादी असून. मोहम्मद लोन असं यातील एका दहशतवाद्याचे नाव आहे. या आधी अमरीन भट या टीव्ही कलाकाराची हत्या करणाऱ्या दोन दहशतवाद्यांनाही ठार मारण्यात यश आले आहे. आयजीपी काश्मीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव शोपियान येथील जान मोहम्मद असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच 2 जून रोजी कुलगाममध्ये (Kulgam) एका बँक मॅनेजरच्या हत्येमध्ये जानचा हात असल्याचे बोलले जात आहे.

लष्कर-ए-तैयबाशी संबंध

काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील कारवाई जम्मू-काश्मीर पोलीस करत आहेत. याआधी मंगळवारी श्रीनगरमधील बेमिना भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचंही सांगण्यात येत आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी