भूदलाच्या कमांडरची ४ दिवसांची बैठक सोमवारी सुरू होणार

Army commander review Ladakh situation internal reforms at four day meet दिल्लीत भूदलाच्या कमांडरची ४ दिवसांची बैठक सोमवारी २६ ऑक्टोबरला सुरू होणार. लष्करप्रमुख नरवणे बैठकीचे अध्यक्ष आहेत.

Army commander review Ladakh situation internal reforms at four day meet
भूदलाच्या कमांडरची ४ दिवसांची बैठक सोमवारी सुरू  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भूदलाच्या कमांडरची ४ दिवसांची बैठक सोमवारी सुरू होणार
  • लष्करप्रमुख नरवणे बैठकीचे अध्यक्ष
  • बैठकीत पुढील सहा महिन्यांच्या भूदलाच्या नियोजचाची चर्चा होणार, दोन्ही सीमेवरील युद्धाच्या तयारीचा आढावा घेणार

नवी दिल्ली: विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी, सोमवारी २६ ऑक्टोबर रोजी दिल्लीत भूदलाच्या (भारतीय लष्कर / भारतीय भूदल सेना / भारतीय भूसेना / Indian Army) कमांडरची बैठक होत आहे. ही बैठक सलग चार दिवस चालणार आहे. बैठकीत एकाचवेळी दोन देशांशी लढण्यासाठीच्या तयारीबाबत चर्चा होणार आहे. तसेच भूदलाच्या युद्धाच्या तयारीचा आढावा बैठकीत घेतला जाईल. भूदलाकडे उपलब्ध असलेल्या साधनांचा सुयोग्य वापर करण्यासाठी नव्या योजना निश्चित केल्या जातील. भूदलासाठी दिल्या जाणाऱ्या निधीचा सुयोग्य वापर करण्याबाबत कमांडर पातळीवर नियोजन केले जाईल. भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (General Manoj Mukund Naravane, Chief of the Army Staff of the Indian Army) या बैठकीचे अध्यक्ष असतील. बैठकीत पुढील सहा महिन्यांचा विचार करुन नियोजन केले जाईल. (Army commander review Ladakh situation internal reforms at four day meet)

कमांडर मीटिंगमध्ये लष्करप्रमुख, भूदलाचे सर्व कमांडर, भूदलाच्या सर्व मुख्यालयांचे प्रमुख (Principal Staff Officer - PSO) आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. बैठकीत लडाखमध्ये निर्माण झालेल्या तणावावर आणि तिथे पुढील सहा महिन्यात काय करायचे याबाबत चर्चा होणार आहे.

बैठकीच्या पहिल्या दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh, Minister of Defence of India / Raksha Mantri), सैन्याच्या तिन्ही दलांचे प्रमुख  (Chief of Defence Staff - CDS) सीडीएस बिपिन रावत (General Bipin Rawat, Chief of Defence Staff), लष्करप्रमुख नरवणे, नौदलप्रमुख अॅडमिरल करमबिर सिंह (Admiral Karambir Singh, Chief of the Naval Staff) आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया (Air chief marshal Rakesh Kumar Singh Bhadauria - Air chief marshal R K S Bhadauria or R K Bhadauria) सर्व कमांडरना देशापुढील आव्हानांबाबत मार्गदर्शन करतील. या नंतर चर्चेला सुरुवात होणार आहे.

बैठकीच्या शेवटच्या दिवशी सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा या विषयावर चर्चा होणार आहे. या चर्चेची सुरुवात बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचे (Border Roads Organisation - BRO) महासंचालक (Director General) लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह (Lt. Gen.Harpal Singh) करणार आहेत. बैठकीचा समारोप गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या भाषणाने होणार आहे.

भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (General Manoj Mukund Naravane, Chief of the Army Staff of the Indian Army) ४ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत नेपाळचा दौरा करणार आहेत. 'रॉ'च्या प्रमुखांच्या विशेष दौऱ्यानंतर हा अधिकृत दौरा होत आहे. नरवणे यांना नेपाळ दौऱ्यात नेपाळच्या लष्कराचे मानद प्रमुखपद (honorary rank of general of the Nepali Army) दिले जाणार आहे. नेपाळच्या राष्ट्रपतींच्या हस्ते नरवणे यांचा हा गौरव केला जाणार आहे. यानंतर लष्करप्रमुखही नेपाळच्या पंतप्रधानांशी काही मुद्यांवर चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी