Army jawan shot dead : रेल्वे स्थानकावर जात असताना लष्कराच्या जवानाला लुटले, गोळ्या घालून केले ठार

रेल्वे पकडण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे निघालेल्या लष्कराच्या जवानाने स्नॅचिंगचा प्रतिकार केल्यामुळे पाटणा येथे दरोडेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.

Army jawan robbed shot dead while on way to Patna railway station read in marathi
लष्कराच्या जवानाला लुटले, गोळ्या घालून केले ठार 
थोडं पण कामाचं
  • बिहारची राजधानी पाटणामध्ये गुन्ह्यांचा अंत होताना दिसत नाही. ताज्या घटनेत कंकरबाग येथे लुटमार करून लष्कराच्या जवानाची अज्ञात दरोडेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली.
  • गुरुवारी सकाळी लष्कराचा जवान रेल्वे स्थानकाकडे जात असताना ही घटना घडली.
  • लष्करी जवान दुचाकीवरून रेल्वेकडे जात असताना पाटणा रेल्वे जंक्शनचा रस्ता विचारण्यासाठी दरोडेखोरांनी त्याला अडवले.

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये गुन्ह्यांचा अंत होताना दिसत नाही. ताज्या घटनेत कंकरबाग येथे लुटमार करून लष्कराच्या जवानाची अज्ञात दरोडेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. गुरुवारी सकाळी लष्कराचा जवान रेल्वे स्थानकाकडे जात असताना ही घटना घडली. (Army jawan robbed shot dead while on way to Patna railway station read in marathi)

अधिक वाचा :  प्रेयसीने साधला डाव... प्रियकराने थेट मृत्यूला कवटाळलं

लष्करी जवान दुचाकीवरून रेल्वेकडे जात असताना पाटणा रेल्वे जंक्शनचा रस्ता विचारण्यासाठी दरोडेखोरांनी त्याला अडवले. अचानक हल्लेखोरांनी जवानाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.

अधिक वाचा : बास्केटबॉलपटूवर बलात्काराचा प्रयत्न,विरोध करताच छतावरुन ढकलल

जवानाने स्नॅचिंगला प्रतिकार केला त्यानंतर दरोडेखोरांनी लष्करी जवानावर गोळीबार केला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. पोस्टमॉर्टमनंतर पोलिसांनी जवानाचा मृतदेह त्याच्या मूळ गावी पाठवला आहे.

पोलिसांनी सांगितले की ते या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि हल्लेखोरांबद्दल कोणताही सुगावा मिळण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करत आहेत.

अधिक वाचा :  खुशी कपूरचे बोल्ड फोटोशूट

"जवान आपल्या चुलत भावासोबत बाईकवरून रेल्वे स्टेशनवर जात होते. त्यांना अज्ञात हल्लेखोरांनी अडवले आणि त्यांना पाटणा रेल्वे स्टेशनचा पत्ता विचारला आणि जवानाची गोळ्या झाडून हत्या केली," असे पाटणाचे एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी सांगितले.

बुधवारी आणखी एका घटनेत, कोचिंगला जात असलेल्या एका मुलीची एका मुलाने पाटणाच्या बायपास परिसरात गोळ्या झाडून हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी मागून मुलीकडे येत असून तिच्या डोक्यात गोळी झाडत असल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी