Agnipath recruitment schedule : नवी दिल्ली : लष्कर, नौदल आणि हवाई दलाने रविवारी अग्निपथ योजनेंतर्गत (Agnipath scheme) सैनिकांच्या भरतीसाठी विस्तृत वेळापत्रक (recruitment schedule for Agnipath scheme) जाहीर केले आहे. तिन्ही सशस्त्र दलांनी आज पत्रकार परिषद घेत तिन्ही दलातील भरतीसंदर्भात माहिती दिली आहे. सशस्त्र दलांचे वय कमी करण्यासाठी ही योजना राबविली जात असल्याचे प्रतिपादन या तिन्ही दलांकडून करण्यात आले आहे. लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल ए पुरी यांनी या योजनेचे समर्थन करताना सांगितले की तिन्ही दलातील सैनिकांचे वय कमी करण्याचा मुद्दा गेल्या काही काळापासून विचाराधीन होता. शिवाय कारगिल पुनरावलोकन समितीनेही त्यावर निरीक्षणे नोंदवली आहेत. (Army, Navy, Air Force declared the schedule for recruitment for recently announced Agnipath scheme )
पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल पुरी म्हणाले की, सरकार अग्निपथ योजना लागू करण्यास पुढे जात आहे आणि तरुणांना त्यांचा निषेध संपवण्याचे आवाहन केले.
अधिक वाचा : Breaking News : दिल्लीसाठी उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनं घेतला पेट, पाहा Video
या योजनेंतर्गत अग्निवीरांना सामील करण्याच्या नौदलाच्या (Navy) योजनेची माहिती देताना व्हाइस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले की, नौदल मुख्यालय 25 जूनपर्यंत भरतीसाठी विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल. भर्तीची पहिली तुकडी 21 नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण कार्यक्रमात सामील होईल.
व्हाइस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी पुढे म्हणाले की, नौदल या योजनेअंतर्गत महिला आणि पुरुष दोघांनाही अग्निवीर म्हणून भरती करते आहे.
अग्निपथ योजनेंतर्गत भरतीसाठी भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) योजनेबद्दल, एअर मार्शल एस के झा म्हणाले की नोंदणी प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होईल आणि भरतीच्या पहिल्या टप्प्यासाठी ऑनलाइन परीक्षेची प्रक्रिया 24 जुलैपासून सुरू होईल. एअर मार्शल झा पुढे म्हणाले की, "आम्ही 30 डिसेंबरपर्यंत भरतीच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू करण्याचा विचार करत आहोत."
अधिक वाचा : Agnipath Protest : JDU सोबतच्या वादात केंद्राचा मोठा निर्णय, भाजपच्या १२ नेत्यांना Y ग्रेड सुरक्षा
लष्कराच्या (Army) भरती योजनेबद्दल, लेफ्टनंट जनरल बन्सी पोनप्पा म्हणाले की, लष्कर सोमवारी एक मसुदा अधिसूचना जारी करेल आणि त्यानंतरच्या सूचना 1 जुलैपासून सैन्याच्या विविध भरती युनिट्सद्वारे जारी केल्या जातील. अग्निपथ योजनेंतर्गत भरती प्रक्रिया संपूर्ण भारतात ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होईल, असे ते म्हणाले.
लेफ्टनंट जनरल पोनप्पा म्हणाले की, 25,000 जवानांचा समावेश असलेली पहिली तुकडी डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात प्रशिक्षण कार्यक्रमात सामील होईल. भरतीचा दुसरा लॉट 23 फेब्रुवारीच्या सुमारास त्यांच्या प्रशिक्षणात सामील होईल.ते म्हणाले की सुमारे 40,000 कर्मचारी निवडण्यासाठी देशभरात एकूण 83 भरती मेळाव्याचे आयोजन केले जाईल.
काही दिवसांपूर्वीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सेनादलांच्या प्रमुख एका पत्रकार परिषदेत सैन्यदलातील नव्या भरती प्रक्रियेबद्दल म्हणजे अग्निपथ योजनेबद्दलची घोषणा केली होती.