Turkey Syria Earthquake News in Marathi : भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियात मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. तुर्कस्तानमध्ये 31 हजार 643 तर सीरियात 4 हजार 614 जणांचा मृत्यू झाला. दोन्ही देशातील मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. संयुक्त राष्ट्रांनी तसेच काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी भूकंपात 50 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली आहे. तुर्कस्तान सरकारने भूकंपाचा जबर तडाखा बसल्यानंतर देशातील 113 बिल्डरांविरोधात अटक वॉरंट काढले आहे.
भूकंपप्रवण क्षेत्रात भूकंपरोधक इमारत बांधावी लागते. पण 113 बिल्डरांनी सुरक्षित इमारती बांधल्या नाही. याच कारणामुळे इमारती एकमेकांवर पडल्या आणि ढिगाऱ्यात अडकल्यामुळे अथवा ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. हा आरोप ठेवून तुर्कस्तान सरकारने देशातील 113 बिल्डरांविरोधात अटक वॉरंट काढले आहे. या बिल्डरांविरोधात कायदेशीर कारवाई होणार असल्याचे तुर्कस्तान सरकारने जाहीर केले आहे.
तुर्कस्तान आणि सीरियात भारताचे ऑपरेशन दोस्त
बाप रे बाप!, प्रलयकारी भूकंपानंतर उद्धवस्त तुर्कीचे pics पाहून तुम्हालाही रडू येईल!
तुर्कस्तान आणि सीरियात भूकंप, 11 हजारांपेक्षा जास्त मृत्यू
नागरिक गृहकर्ज काढून घर खरेदी करतात. याच कारणामुळे ते घर ज्या इमारतीत आहे त्या इमारतीचा पाया मजबूत असावा, अशी अपेक्षा नागरिक बाळगतात. पण तुर्कस्तानमध्ये अनेक ठिकाणी इमारतींची ज्या प्रकारे पडझड झाली ती बघता संबंधित इमारतींचे बांधकाम करताना मजबुतीच्या बाबतीत बिल्डरांकडून तडजोड झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात कारवाईसाठी तुर्कस्तान सरकारने 113 बिल्डरांविरोधात अटक वॉरंट काढले आहे. या 113 बिल्डरांवर इमारतीच्या गुणवत्तेशी तडजोड केल्याचा आरोप आहे. अटक वॉरंट काढलेल्या 113 बिल्डरांना दिसताक्षणी अटक करण्याचे आदेश तुर्कस्तान सरकारने दिले आहेत.