अटकेत असलेल्या चिनी गुप्तहेराने गुरुग्राममध्ये उघडले होते 80 खोल्यांचे हॉटेल

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 13, 2021 | 14:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

पश्चिम बंगालच्या मालदा इथे बेकायदेशीररित्या भारत आणि बांगलादेशची सीमा पार करण्याचा प्रयत्न करताना पकडल्या गेलेल्या हान जुनवे या चीनच्या नागरिकाने गुरुग्राममध्ये आपले हॉटेल उघडल्याची माहिती समोर येत आहे.

Hotel owned by arrested Chinese citizen
अटकेत असलेल्या चिनी गुप्तहेराने गुरुग्राममध्ये उघडले होते 80 खोल्यांचे हॉटेल  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • बंगालमध्ये पकडलेल्या चिनी नागरिकाकडून सातत्याने खुलासे
  • हान जुनवे याने गुरुग्राममध्ये उघडले होते लग्झरी हॉटेल
  • अनेक वर्षांपासून होते गुरुग्राममध्ये वास्तव्य, आधी चालवत असे पीजी

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या (West Bengal) मालदा (Malda) इथे बेकायदेशीररित्या भारत (India) आणि बांगलादेशची (Bangladesh) सीमा (border) पार (cross) करण्याचा प्रयत्न (attempt) करताना पकडल्या गेलेल्या हान जुनवे या चीनच्या नागरिकाने (Chinese citizen) फक्त सिमकार्डची तस्करीच (simcard smuggling) केलेली नाही, तर त्याने आपला कारभारही (business) पसरवला आहे. हान जुनवेबद्दल आता अनेक खुलासे (revelations) होत आहेत जे धक्कादायक (shocking) आहेत. हानने दिल्लीच्या (Delhi) गुरुग्राम (Gurugram) या उच्चभ्रू रहिवासी भागात आपले 80 खोल्यांचे एक हॉटेल (hotel) काढले होते. याआधी त्याने अतंर्वस्त्रांमध्ये लपवून 1300 भारतीय सिमकार्डांची तस्करी केल्याची माहिती समोर आली होती.

डीएलएफच्या भागामध्ये काढले होते हॉटेल

हान जुनवे व्यवसायाच्या नावाखाली भारतात आला होता आणि इथून तो गुप्त माहिती चीनला पाठवत असल्याचा संशय आहे. त्याच्या या काळ्या व्यवसायाचा अंदाज यावरूनच लावला जाऊ शकतो की त्याने गुरुग्रामच्या डीएलएफ या उच्चभ्रू भागात स्टार स्प्रिंग या नावाने एक हॉटेल उघडले होते. यात सर्व सुविधा आहेत आणि जवळच स्पा सेंटरही आहे. या हॉटेलमध्ये 80 खोल्या आहेत. साधारण 5-6 वर्षांपासून गुरुग्राममध्ये राहात असलेला हान याआधी 30 खोल्यांचे एक पीजी चालवत असे.

या विशेष पद्धतीने तयार केले होते हे हॉटेल

या हॉटेलच्या संकेतस्थळावरून कळते की हे हॉटेल गुरुग्राममध्ये येणाऱ्या चीनी, जपानी आणि कोरियाच्या प्रवाशांसाठी खासकरून तयार करण्यात आले होते. संकेतस्थळावर लिहिले आहे की या हॉटेलमध्ये चिनी उपहारगृहासह इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. संकेतस्थळानुसार इथे दोन बँक्वेट हॉल्सही आहेत जो लग्ने, रिसेप्शन, वाढदिवस, पार्टी, व्यावसायिक बैठका, मोठी संमेलने आणि कॉर्पोरेट पार्ट्यांसाठी वापरले जात असत.

एका पार्टनरसह फरार होता हान जुनवे

हानच्या हालचालींवर जेव्हा पोलिसांना संशय आला तेव्हा यूपीच्या दहशतवाद विरोधी पथकाने हॉटेलवर धाड टाकली, पण त्याआधीच तो चीनला पळून गेला. त्याच्या कंपनीतले त्याचे दोन जवळचे कर्मचारी पोलिसांच्या हाती लागले. एटीएसच्या पथकाला कळले की हान भारतातल्या विविध भागांमधून सिम खरेदी करून आपल्या देशी पाठवत असे. इतकेच नाही, तर हानने मुंबई आणि हैदराबादमध्येही आपले व्यवसाय उघडले होते आणि त्याचा एक पार्टनर अब्दुल रज्जाक अद्याप फरार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी