‘आपलं तोंड बंद ठेवा’, पोलीस अधिकाऱ्यानं टीव्हीवर अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंपला सुनावलं

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 02, 2020 | 22:11 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Houston police chief Art Acevedo slams Donald Trump: अमेरिकेच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं चक्क देशाच्या राष्ट्रपतींना टीव्हीवर सुनावलंय. त्यांनी एका इंटरव्यू दरम्यान एक मोठं वक्तव्य केलं.

Art Acevedo slams Donald Trump on news interview (Twitter/AP)
‘आपलं तोंड बंद ठेवा’, पोलिसानं ट्रम्प यांना सुनावलं 

थोडं पण कामाचं

  • अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना पोलीस अधिकाऱ्यानं सुनावलं.
  • ह्यूस्टन पोलिसांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्याकडे बोलण्यासारखं नसेल, तर तोंड बंद ठेवा, असं ठणकावलं.
  • जॉर्ज फ्लॉयड मृत्यू प्रकरणानंतर अमेरिकेत कृष्णवर्णीय नागरिकांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय.

Art Acevedo slams Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप सध्या खूप चर्चेत आहेत. अधिक वेळा ते आपल्या चुकीच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सध्या अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये हिंसाचार माजलाय, त्यासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप सुद्धा जबाबदार आहेत. त्यांचे काही वक्तव्य आणि ट्विटमुळे कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूमुळे नाराज असलेल्या नागरिकांचा राग अधिक वाढला आहे. यादरम्यान अमेरिकेतील शहर ह्यूस्टनचे प्रमुख आर्ट एसवेडो यांनी एका न्यूज चॅनेलवर लाईव्ह इंटरव्यू दरम्यान सरळ-सरळ अमेरिकेच्या राष्ट्रपतींवर निशाणा साधला.

काय आहे हे प्रकरण?

जॉर्ज फ्लॉयडचा मृत्यू काही अमेरिकन पोलिसांमुळे झाला आणि यामुळे तिथले कृष्णवर्णीय नागरिक नाराज होते. अशातच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिले ट्विट केलं, ज्यात त्यांनी सरळ-सरळ कृष्णवर्णीयांना लुटारू म्हटलं. तर सर्व कृष्णवर्णीय नागरिक रस्त्यावर आल्यानंतर त्यांनी राज्यातील गव्हर्नरसोबत बोलत त्यांना प्रदर्शनकरणाऱ्या नागरिकांना हुलकावण्यास सांगितलं आणि जर नागरिकांनी ऐकलं नाही तर सैन्यबलाचा वापर करू असंही वक्तव्य केलं.

कोण आहे पोलीस अधिकारी आर्ट एसवेडो

आर्ट एसवेडो हे अमेरिकेच्या ह्यूस्टन शहराचे पोलीस प्रमुख आहेत. ते खूप स्पष्टवक्ते अधिकारी म्हणून ओळखले जातात. ह्यूस्टन तेच शहर आहे जिथं जॉर्ज फ्लॉयड राहत होते. एका अमेरिकन न्यूज चॅनेलवर जेव्हा अँकरनं आर्ट एसवेडोसोबत सद्य परिस्थितीबाबत प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी यावर सविस्तर उत्तर दिलं आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे फ्लॉयडचा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी बचाव केला नाही. त्यांनी फक्त जाहीर केलं की, ते आपल्या शहरातील लोकांच्या समर्थनासाठी उभे राहतील. तसंच त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतींनाही सल्ला दिला.

आपलं तोंड बंद ठेवा

पोलीस अधिकारी आर्ट एसवेडोनं म्हटलं, ‘मी सांगू इच्छितो की, देशातील अधिकाधिक पोलीस असे आहेत, जे चांगलं काम करतात. ते वर्षानुवर्ष काम करत आहेत, मात्र कधी कुणाला नुकसान पोहोचवलं नाही. कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला हा हक्क नाही की, तो कुठल्याही व्यक्तीच्या मानेवर आपला गुडघा ठेवेल, जेव्हा की तो व्यक्ती दया-याचना करतोय. यावर कुठलंही कारण किंवा स्पष्टीकरण असू शकत नाही.’ नंतर जेव्हा अँकरनं डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीत विचारलं तेव्हा, त्यांनी आपल्याला प्रदर्शनकरणाऱ्यांवर हावी व्हायला सांगितलं आणि कमकुवत म्हटलं. त्यावर बोलतांना पोलीस अधिकाऱ्यानं म्हटलं, ‘मी आपल्या बाजूनं आणि अमेरिकेच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्यावतीनं अमेरिकेचे राष्ट्रपती यांना म्हणू इच्छितो की, जर त्यांच्याजवळ काही बोलायला नसेल तर त्यांनी आपलं तोंड बंद ठेवावं. आम्ही इथं लोकांसोबत उभं राहू इच्छितो, हा एक संवेदनशील विषय आहे.’

रस्त्यावर उतरले होते एसवेडो, व्हिडिओ झाला होता व्हायरल

ह्यूस्टनमध्ये श्वेतवर्षीय आणि कृष्णवर्णीय लोकांदरम्यान परिस्थिती खराब होत होती आणि आर्ट एसवेडोकडून हे बघितलं गेलं नाही. ते हिमतीनं नागरिकांमध्ये पोहोचले आणि त्यांनी जे केलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. एसवेडो या व्हिडिओमध्ये तिथं उपस्थित सर्व प्रदर्शनकाऱ्यांना धीर देत दिसले आणि त्यासोबतच ते म्हणाले आम्ही तुमच्या सोबत आहोत जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही साथ देणार. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय.

अमेरिकेत कोविड-१९ महामारीनं पहिलेच देशाचं कंबरडं मोडलंय आणि आता हा नवीन वाद संपूर्ण देशाला निराश करत आहे. डोनाल्ड ट्रम्प सध्या या दोन्ही प्रकरणांमध्ये फसलेले दिसत आहेत. एकीकडे जिथं देशात महामारीच्या सुरुवातीच्या काळात ते परिस्थिती सांभाळू शकले नाहीत आणि आता जॉर्ज फ्लॉयडवरून त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी