काश्मीरमध्ये यंदा १५ ऑगस्ट होणार वेगळ्या पद्धतीने साजरा

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 13, 2019 | 19:23 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Article 370: केंद्र सरकारच्या कलम ३७० हटविण्याच्या निर्णायानंतर यंदाचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन काश्मीरसाठी वेगळा असणार आहे. काश्मीरमध्ये केवळ भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकतानाचा क्षण ऐतिहासिक असणार आहे.

Shrinagar Lal Chowk  file photo
यंदाचा १५ ऑगस्ट काश्मीरसाठी असेल वेगळा   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • वन नेशन वन फ्लॅगची संकल्पना आता साकार
  • १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन काश्मीरसाठी वेगळा असणार
  • काश्मीरमध्ये केवळ भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकताना दिसणार

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीर नव्हे तर, देशाच्या इतिहासातच ५ ऑगस्ट २०१९ ही तारीख वेगळी असणार आहे. त्यातही जम्मू-काश्मीरसाठी या तारखेचं मोल वेगळचं हा. या दिवशी केंद्र सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटविण्याचा निर्णय घेतला. एका झटक्यात हा निर्णय झाला. केंद्राच्या या निर्णयावर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. भारतात सर्वत्र या निर्णयाचं स्वागत झालं. पण, काहींनी हा निर्णय लोकशाहीला अनुसरून नसल्याचं म्हटलंय. निर्णय घेण्यापूर्वी काश्मीरच्या जनतेला विश्वासात घेणं महत्त्वाचं होतं, असा सूर अनेकांनी आळवला आहे. अर्थात जल्लोष करणाऱ्यांच्या तुलनेत विरोध करणाऱ्यांची संख्या अतिशय फुटकळ होती. स्वातंत्र्यानंतर काश्मीर भारताचा भाग असूनही नसल्यासारखा होता, असं अनेकाचं मत होतं. आता सरकारने निर्णय घेतलाय. त्यानंतर काश्मीर खोऱ्यात कोण कोणते बदल होणार याची उत्सुकता आहे.

एकच झेंडा दिसणार

केंद्र सरकारच्या कलम ३७० हटविण्याच्या निर्णायानंतर यंदाचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन काश्मीरसाठी वेगळा असणार आहे. काश्मीरच्या जनतेच्या मनात अजूनही संभ्रम आहे. राज्याचे स्वरूप कसे असणार? याविषयी संभ्रम आहे. त्यांचे सामान्य जीवन कसे असेल? त्यांना कोणते अधिकार मिळतील? असे अनेक प्रश्न काश्मिरी जनतेच्या मनात घर करून आहेत. त्यातच आता भारताचा स्वातंत्र्यदिन अगदी तोंडावर आला आहे. त्या दिवशी काश्मीरमध्ये केवळ भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकताना दिसणार आहे.

इतिहासात प्रथमच घडणार असं

इतिहासात पहिल्यांदाच काश्मीरमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन केवळ तिरंग्यासह साजरा केला जाणार आहे. केवळ राष्ट्रध्वज पाहणे निश्चितच सुखावह असणार आहे. या बदलानंतर वन नेशन वन फ्लॅगची संकल्पना आता साकार झाल्याचे दिसणार आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यानंतर काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी आपल्या गाडीवरील काश्मीर राज्याचा झेंडा उतरवला होता.

राजकीय आरोप-प्रत्यारोप

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहिल्यांदा राज्यसभेत या संदर्भात प्रस्ताव दिला होता. त्यात कलम ३७० रद्द करण्याची शिफारस होती. पहिल्यांदा राज्यसभेची आणि त्यानंतर लोकसभेची मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याला मंजुरी दिली. त्यानुसार आता जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश असणार आहेत. त्यात जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात असेल तर, लडाख पूर्णपणे केंद्र सरकारच्या नियंत्रणात असेल. जम्मू-काश्मीरमधील कायदा सुव्यवस्थेवर केंद्र सरकारचा अंकूश असेल तर, इतर गोष्टी तेथील विधानसभेच्या हातात असणार आहेत. काश्मीरमधील स्थानिक राजकीय पक्षांनी केंद्राच्या या निर्णयाचा विरोध केला असून, सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद कमी होईल, असा दावा केला आहे. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्राच्या निर्णयानंतर काश्मीरमधील परिस्थिती अतिशय वाईट असल्याचे म्हटले होते. दरम्यान, बकरी ईदच्या निमित्ताने काश्मीरमधली संचारबंदी हटवण्यात आली असून, बाजारपेठ खुली करण्यात आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
काश्मीरमध्ये यंदा १५ ऑगस्ट होणार वेगळ्या पद्धतीने साजरा Description: Article 370: केंद्र सरकारच्या कलम ३७० हटविण्याच्या निर्णायानंतर यंदाचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन काश्मीरसाठी वेगळा असणार आहे. काश्मीरमध्ये केवळ भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकतानाचा क्षण ऐतिहासिक असणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...