माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक, भाजपचे वरिष्ठ नेते एम्स रुग्णालयात

Arun Jaitley: माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे नेते अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक नेते जेटलींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दाखल

Arun Jaitley
भाजप नेते अरुण जेटली 

थोडं पण कामाचं

  • भाजप नेते अरुण जेटली यांची प्रकृती अत्यंत नाजूक
  • अरुण जेटली यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु
  • भाजपचे वरिष्ठ नेते एम्स रुग्णालयात दाखल
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी एम्स रुग्णालयात जाऊन अरुण जेटलींच्या प्रकृतीची केली विचारपूस
  • यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील एम्स रुग्णालयात जाऊन अरुण जेटली यांच्या प्रकृतीची केली होती विचारपूस

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाजपचे अनेक वरिष्ठ नेते एम्स रुग्णालयात उपस्थित आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन हे सुद्धा एम्स रुग्णालयात पोहोचले आहेत. अरुण जेटली यांची प्रकृती आणखीनच खालावल्याने त्यांना एक्स्ट्राकॉर्पोरिअल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (Extracorporeal Membrane Oxygenation) वर ठेवण्यात आले आहे.

अरुण जेटली यांच्या प्रकृतीवर एम्स रुग्णालयातील डॉक्टरांचं एक फथक लक्ष ठेवून आहे. ६६ वर्षीय अरुण जेटली यांना श्वसनाचा त्रास जाणवल्याने ९ ऑगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तेव्हा पासून अरुण जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एम्स रुग्णालयाने १० ऑगस्टपासून अरुण जेटली यांच्या प्रकृती संदर्भात कुठलंही हेल्थ बुलेटिन प्रसिद्ध केलेलं नाहीये.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्री स्मृति इराणी आणि राम विलास पासवान यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते अरुण जेटलींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रविवारी एम्स रुग्णालयात दाखल झाले होते.

शनिवारी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक, बसपाच्या अध्यक्ष मायावती, काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी एम्स रुग्णालयात जेटलींच्या तब्येतीची विचारपूस केली.

अरुण जेटली यांची प्रकृती खूपच चिंताजनक आणि नाजूक आहे. ९ ऑगस्ट रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तेव्हापासून त्यांच्यावर रुग्मालयात उपचार सुरू आहेत. अरुण जेटली हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत. आजपरणामुळेच अरुण जेटली यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवली नाही तसेच निवडणूक प्रचारापासूनही दूरच होते. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अरुण जेटली यांच्याकडे अर्थ आणि संरक्षण मंत्रालया सारख्या महत्वाच्या मंत्रालयांचा कारभार सोपवण्यात आला होता. राफेल करारावरुन जेव्हा मोदी सरकार अडचणीत आली त्यावेळी अरुण जेटली यांनी पुढे येत विरोधकांना उत्तरं दिली आणि सरकारचा बचाव केला होता.

उत्तरप्रदेशातून राज्यसभेचे खासदार असलेल्या अरुण जेटली यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. पंजाबमधील अमृतसर येथून अरुण जेटली यांनी लोकसभेची निवडणूक लढवली मात्र, या निवडणुकीत अरुण जेटली यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१४च्या या निवडणुकीत अरुण जेटलींचा पराभव झाला असला तरी त्यांचं भाजपमधील वजन कमी झालं नाही आणि भाजपचं सरकार येताच त्यांना केंद्रात मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक, भाजपचे वरिष्ठ नेते एम्स रुग्णालयात Description: Arun Jaitley: माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे नेते अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक नेते जेटलींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दाखल
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
मोठी बातमी: 'या' सहा आमदारांनी धरला काँग्रेसचा हात
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
[VIDEO]: धक्कादायक! प्रेम संबंधांमुळे तरुणाला बेदम मारहाण करत जबरदस्ती पाजली लघुशंका
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
चांद्रयान २: आज अतिशय मोठी अपडेट मिळणार, लँडर विक्रमशी संपर्क होणार? 
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: आमदाराच्या कारची पादचाऱ्याला धडक, घटनास्थळीच मृत्यू
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
[VIDEO]: Honour Killing: नवदाम्पत्याला गाडीखाली चिरडले आणि नंतर गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९:  जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १६ सप्टेंबर २०१९: जैश-ए-मोहम्मदची धमकी ते सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ सप्टेंबर २०१९: चांद्रयानबाबत मोठी अपडेट ते मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी