Aryan Khan on Drugs Case : माझी नाहक बदनामी करण्यात आली, आर्यन खानने पहिल्यांदाच बोलून दाखवली खंत

ड्रग्ज प्रकरणात नाव गोवण्यात आल्याने व्यथित झालेल्या आर्यन खानने याविषयी काय प्रतिक्रिया दिली, हे पहिल्यांंदाच समोर आलंं आहे. काहीही दोष नसताना आपली नाहक बदनामी करण्यात आल्याचं त्याने म्हटलं आहे.

Aryan Khan on Drugs Case
ड्रग्ज प्रकरणावर आर्यन खानची पहिली प्रतिक्रिया  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • अमली पदार्थ प्रकरणावर आर्यन खानची प्रतिक्रिया
  • आपली नाहक बदनामी करण्यात आल्याची खंत
  • एका मुलाखतीत अधिकाऱ्याने दिली माहिती

Aryan Khan on Drugs Case | अंमली पदार्थ प्रकरणात (Drugs case) आपली नाहक बदनामी (Defame) करण्यात आली आणि आपला काहीही दोष नसताना विनाकारण तुरुंगात (Jail) सडवण्यात आलं, अशी प्रतिक्रिया आर्यन खाननं (Aryan Khan) दिल्याचं समोर आलं आहे. ड्रग्ज बाळगल्याच्या खोट्या आरोपाखाली आर्यन खानला अटक करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात त्याच्याकडे अंमली पदार्थ नसून तो निर्दोष असल्याचं सिद्ध झाल्यामुळे त्याची या प्रकरणातून सुटका झाली आहे. या पूर्ण काळात स्वतः आर्यन खान, शाहरूख खान किंवा गौरी खान यांपैकी कुणीही जाहीरपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. मात्र आता आर्यनची प्रतिक्रिया समोर आली आहे. 

काय म्हणाला आर्यन?

एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीचा उलगडा केला आहे. ते सांगतात, “अमली पदार्थ प्रकरणात जेव्हा मी आर्यन खानशी बोलत होतो, तेव्हा तो व्यथित होता. माझा काहीही दोष नसताना माझ्यावर हे आरोप का करण्यात आले, असा सवाल त्याने केला. माझ्याकडे अंमली पदार्थ सापडले नाहीत, माझा आणि ड्रग्जचा दूरदूरवर काही संबंध नाही. तरीही माझं नाव या प्रकरणात का गोवण्यात आलं? माझा काहीही दोष नसताना इतके दिवस मला तुरुंगात का ठेवण्यात आलं? या प्रकरणामुळे माझी प्रतिष्ठा धुळीस मिळाली, त्याचं काय? असे प्रश्न आर्यन खानने मला विचारले. माझी चूक काय होती आणि मला नेमक्या कुठल्या गुन्ह्याची शिक्षा दिली जात आहे, असंही त्याने विचारलं.”

ड्रग्जच्या व्यापारात पैसे गुंतल्याचा आरोप झाल्यामुळे आर्यन खान व्यथित झाल्याचा अनुभव संजय सिंह यांनी या मुलाखतीत सांगितला. आर्यनचे वडील शाहरूख यांनी एकदा आसवं गाळत आपल्यापाशी खंत व्यक्त केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आपल्याला जाणीवपूर्वक व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यातून आपण अधिकाधिक स्ट्राँग होत असल्याचं शाहरूख खाननं म्हटल्याचंही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. 

काय आहे प्रकरण?

शाहरूख खानचा पुत्र आर्यन खानला 2 ऑक्टोबर 2021 या दिवशी अमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप करत अटक करण्यात आली होती. शाहरूख खान आणि गौरी खान यांच्यासाठी हा दिवस सर्वाधिक दुःखी आणि तितकाच धक्कादायक ठरला होता. एनसीबीचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा मारून आर्यन खानसह सहा जणांना अटक केली होती. त्यावेळी देशभर हे प्रकरण गाजलं होतं आणि शाहरूख खानच्या मुलाला अटक झाल्यामुळे आणि त्याचा संबंध ड्रग्जशी जोडला गेल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. देशभरातून शाहरूख खान आणि आर्यन खानवर टीकेची झोड उठत होती. 

अधिक वाचा - Salman Khan ला मारण्याचा असा फसला सगळा कट, शार्पशूटरने हॉकी बॉक्समध्ये घेतले होते हत्यार

प्रत्यक्षात मात्र आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलंच नसल्याचं तपासात सिद्ध झालं. त्यामुळे या कारवाईबाबत संशय निर्माण झाला होता. अखेर पुराव्यांअभावी आर्यन खानची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी