Sperm Count Fall : पुरुषांनो सावध व्हा! तुमच्या शुक्राणूंच्या संख्येत होते आहे घट...जगासमोर प्रजनन संकट? पाहा नवीन संशोधन

Sperm Count in men : ऑक्सफर्ड अकॅडेमिकमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या नव्या संशोधनानुसार पुरुषांमधील शुक्रांणूंची संख्या आणि गुणवत्ता यांची स्थिती खालावत चालली असून ती चिंता करायला लावणारी आहे. हा अभ्यास नजीकच्या भविष्यात प्रजनन संकटाचे (Reproduction crisis) संकेत देतो. शिवाय याचा विपरित परिणाम होत पुरुषांमध्ये टेस्टिक्युलर कॅन्सरची प्रकरणे वाढू शकतात. नव्या अभ्यासातून आलेली चिंता करायला लावणारी आहे.

Sperm Count
शु्क्राणूंची संख्या 
थोडं पण कामाचं
  • जगभरातील पुरुषांमधील शुक्रांणूंची संख्या घटते आहे
  • अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
  • जगासमोर प्रजनन संकट उभे राहण्याची भीती

World facing sperm count fall : नवी दिल्ली : कोणत्याही सजीवासाठी प्रजनन (Reproduction) ही एक महत्त्वाची नैसर्गिक क्रिया असते. निसर्गात प्रजननाची क्रिया उत्क्रांती आणि सजीव सृष्टीला पुढे नेत असते. मात्र आता मानवाच्या संदर्भात झालेल्या नव्या अभ्यासातून चिंता करायला लावणारी वस्तुस्थिती समोर आली आहे. जगभरातील पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या (Men Sperm count) आणि शुक्राणूंच्या घनतेत सातत्याने घट होते आहे. यात भारताचादेखील समावेश आहे. ऑक्सफर्ड अकॅडेमिकमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या नव्या संशोधनानुसार पुरुषांमधील शुक्रांणूंची संख्या आणि गुणवत्ता यांची स्थिती खालावत चालली असून ती चिंता करायला लावणारी आहे. हा अभ्यास नजीकच्या भविष्यात प्रजनन संकटाचे (Reproduction crisis) संकेत देतो. संशोधकांनी निदर्शनास आणून दिले की जर शुक्राणूंची घनता पातळी प्रति मिलिलिटर 4 कोटीपेक्षा कमी झाली तर त्याचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम प्रजननावर होतो. शिवाय याचा विपरित परिणाम होत पुरुषांमध्ये टेस्टिक्युलर कॅन्सरची प्रकरणे वाढू शकतात. शिवाय जननेंद्रियातील जन्म दोषदेखील वाढू शकतात. (As per new study sperm count in men is falling globally)

अधिक वाचा  :  बॅंक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप...एटीएमवरदेखील होणार परिणाम

किती देशांमध्ये केला अभ्यास

मानवी प्रजननासंदर्भात अभ्यास करताना संशोधकांनी भारतासह तब्बल 53 देशांतील 57,000 पुरुषांची माहिती गोळा केली आहे. याशिवाय 223 शोध अभ्यासांमधील माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्याचबरोबर शुक्राणूंच्या संख्येवर लिहिण्यात आलेले 868 लेख देखील वाचण्यात आणि अभ्यासण्यात आले.

अधिक वाचा  : शिवसेना परत भाजपकडे मैत्रीची साद घालणार का?

धक्कादायक परिस्थिती

हा अभ्यास करताना संशोधकांच्या असे लक्षात आले की 1973-2018 या कालावधी दरम्यान शुक्राणूंची सरासरी घनता 51.6 टक्क्यांनी घटली. म्हणजेच शुक्राणूंची सरासरी घनता 10.12 कोटी प्रति मिलीलीटरवरून 4.9 कोटी इतकी घसरली आहे. यासोबतच शुक्राणूंची संख्याही 62.3 टक्क्यांनी घसरली आहे. 1970 पासून पुरुषांमधील शुक्राणूंची घनता दरवर्षी 1.16 टक्क्यांनी कमी होऊ लागली आहे. तर 2000 पासून त्यात आणखी मोठी वाढ होत ती 2.64 टक्क्यांनी घसरली आहे.

अधिक वाचा : आपलं काय चुकतयं, हे कळायलं लागलयं : बाळासाहेब थोरात

हे संशोधन पहिल्यांदाच झाले का?

हे महत्त्वाचे संशोधन असले तरी या विषयावरील ते काही पहिलेच संशोधन नाही.  याआधी 2017 मध्ये देखील याच जर्नलने 2017 मध्ये एक लेख प्रकाशित केला होता. या लेखाचे शीर्षक होते शुक्राणूंच्या संख्येमधील टेम्पोरल ट्रेंड: एक पद्धतशीर पुनरावलोकन आणि मेटा-रिग्रेशन विश्लेषण. यातदेखील पुरुषांच्या शुक्राणूंवर अभ्यास करण्यात आला होता. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील पुरुषांमध्ये 1981 ते 2013 या कालावधीत शुक्राणूंच्या संख्येत सातत्याने घट कशी झाली हे त्यात दिसून आले. या भागातील पुरुषांच्या शुक्राणूंमधील घट ही तब्बल 50 ​​टक्क्यांहून अधिक असल्याचे या अभ्यासातून समोर आले होते. 

जीवनशैलीतील बदल, आहाराच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, व्यायामाचा अभाव याचा विपरित परिणाम पुरुषांच्या आरोग्यावर आणि परिणामी शुक्राणूंच्या संख्येवर होतो आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी