Thieves Study: चोरी करण्यापूर्वी चोर घर कसे निवडतात माहित आहे? चोर लक्षात घेतात हे मुद्दे

Thieves research : चोरांची (Thieves)मानसिकता काय असते? ते नेमका कसा विचार करतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. आता चोर नेमके कोणत्या गोष्टींवरून घर हेरतात याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. घरात चोरी (Theft) होऊ नये म्हणून प्रत्येकजण दक्ष असतो. त्यासाठी निरनिराळे उपाय केले जातात, सावधगिरी बाळगली जाते. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी चोरीच्या (Robbery) घटना होतच असतात. चोर नेमका काय विचार करतात जाणून घ्या.

Thieves mindset
चोरांची मानसिकता  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • चोरांवर पहिल्यांदाच अभ्यास
  • चोरी करताना चोरांची मानसिकता काय असते
  • चोरी करण्यासाठी चोर घर कसे निवडतात

Points considered by thieves for theft : नवी दिल्ली: आपल्या घरात चोरी (Theft) होऊ नये म्हणून प्रत्येकजण दक्ष असतो. त्यासाठी निरनिराळे उपाय केले जातात, सावधगिरी बाळगली जाते. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी चोरीच्या (Robbery) घटना होतच असतात. अशावेळी चोरांची (Thieves)मानसिकता काय असते? ते नेमका कसा विचार करतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. आता चोर नेमके कोणत्या गोष्टींवरून घर हेरतात याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घराची नेमप्लेटही चोरांना आकर्षित करू शकते का? तर हो चोरांना त्यामुळे आकर्षण वाटू शकते. घरात चोरी करायची की नाही हे ठरवण्यासाठी चोर आधी नेम प्लेट बघतात. तसे पाहिले तर लोक अनेकदा नावाच्या प्लेटवर नावासह पोस्ट किंवा व्यवसाय लिहितात. यावरून चोरटे कोणते घर फोडायचे याचा अंदाज घेतात. बेल्जियमच्या गेन्ट युनिव्हर्सिटीचे कुरलर्सन आणि मद्रास युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. प्रियमवदा यांनी केलेल्या एका अभ्यासातून (Study on Thieves) हे मुद्दे समोर आले आहेत. गंमत म्हणजे चोरांचा अभ्यास करणारा हा या प्रकारचा पहिलाच अभ्यास आहे. (As per new study thieves consider these points before robbery)

या अभ्यासानुसार आलिशान बांधलेले घर, नेम प्लेटवर लिहिलेला व्यवसाय आणि बाहेर पार्क केलेले वाहन याच्या आधारे चोर कोणते घर चोरी करायचे हे ठरवतात. एकदा घर निश्चित केल्यानंतर ते कोणत्याही सणाच्या वेळी किंवा लग्नाच्या वेळी चोरी करतात. याचे मुख्य कारण म्हणजे या काळात लोक बँकेतून रोख रक्कम आणि दागिने काढून घरी ठेवतात. चोरांची मानसिकता आणि त्यांचे नियोजन समजून घेणे हा या अभ्यासामागील मुख्य उद्देश आहे. चोरीला आळा घालण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला आहे. 

अधिक वाचा  : बुलडोझरच्या भीतीपोटी राणे पाडताय अधीश बंगल्याचं बांधकाम

नेमप्लेटवरून चोरांना येतो कमाईचा अंदाज

हा अभ्यास करताना 314 चोरट्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. हा अभ्यास करणाऱ्या  कुरलारसेन यांनी सांगितले की, 63 टक्के प्रकरणांमध्ये असे आढळून आले की चोर नेम प्लेटवर लिहिलेल्या व्यवसायाच्या आधारे कमाईचे मूल्यांकन करतात. 70 टक्के प्रकरणांमध्ये असे दिसून आले की, चोरटे त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या घरांना लक्ष्य करतात कारण त्यांना त्या भागातील मार्ग आणि ठिकाणांची कल्पना आहे. तर 72 टक्के घटनांमध्ये घरासमोर उभी असलेली महागडी कार पाहून चोरट्यांनी चोरीचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. म्हणजेच चोर जिथे चोरी करायची तेथील आर्थिक सुबत्तेचा अंदाज घेतात.

अधिक वाचा  : दर गुरुवारी म्हणा साई बाबांची आरती

घराची रचना, घराचे स्थान महत्त्वाचे 

या अभ्यासानुसार घरफोडे (94 टक्के) अशा घरांमध्ये प्रवेश करत नाहीत जे घर नेहमी व्यापलेले असतात किंवा जिथे लोकांची संख्या जास्त असते. चोरांसाठी घराची रचनाही खूप महत्त्वाची असते. 97% प्रकरणांमध्ये, चोर अशा घरांना लक्ष्य करतात ज्यात एकापेक्षा जास्त बाहेर जाण्याचे मार्ग आहेत. मग चोराला पळून जाण्यासाठी अनेक पर्याय असतात. जर तुमचे घर रस्त्यावरील शेवटचे घर असेल, त्यानंतर रस्ता नसेल, तर तुमच्या घरात चोरीची शक्यता कमी होईल. पोलिसांच्या गस्तीच्या वेळेचीही चोरटे काळजी घेतात. शिवाय चोर चोरी केल्यानंतर पकडले जाऊ नये म्हणून सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतात. पोलिसांची नाकेबंदी टाळण्यासाठी चोर असे करतात. 

cctv पेक्षा कुत्र्यांची जास्त भीती

चोर कुत्र्यांना फार घाबरतात. घरात बसवलेल्या सीसीटीव्हीपेक्षा चोरांना तिथे ठेवलेल्या कुत्र्याची भीती जास्त असते. सीसीटीव्हीची नजर टाळण्यासाठी चोर ते झाकून टाकतात किंवा सीसीटीव्हीसमोर येऊ नयेत अशा ठिकाणाहून जातात. मात्र कुत्र्यावर नियंत्रण ठेवणे त्यांना अवघड जाते. कारण कुत्रा अगदी कमी आवाजातही भुंकायला लागतो किंवा अज्ञात व्यक्तीवर हल्ला करतो. नव्या चोरांना पोलिसांची भीती असते. मात्र सराईत चोरांना पोलिसांची भीती वाटत नाही. चोर तुरुंगात चोरीचे प्रगत तंत्र शिकतात.

कुलूप तोडणे

आपण घराच्या सुरक्षेसाठी कुलुप लावतो. मात्र चोरट्यांना कुलूप तोडण्यात जास्त वेळ लागत नाही. कोणत्याही साधनांच्या मदतीशिवाय ते दहा सेकंदात अनेक कठीण कुलूप तोडू शकतो. यासाठी त्यांना फक्त एक लहान रॉड आणि कापड आवश्यक असते. 

अधिक वाचा : बाळा नांदगावकरांचा संताप,"त्याचा ऑन द स्पॉट एन्काऊंटर करावा" 

मागील दरवाजातून प्रवेश

घराच्या मुख्य गेटचे कुलूप मजबूत असल्याचे चोरांना माहीत असते. कारण सर्वसाधारणपणे लोक त्यांच्या व्हरांड्यात किंवा मागच्या गेटच्या मजबुतीची कमी काळजी घेतात. म्हणूनच चोर मग  घरात प्रवेश करण्यासाठी मागील गेटचा अधिक वापर करतात. घरात प्रवेश केल्यानंतर चोर प्रथम बेडरूम, किचन आणि पूजाघर अशा तीन ठिकाणांवर लक्ष देतात.

चोरी टाळण्यासाठीच्या टिप्स-

  1. घराबाहेर पडताना शेजाऱ्यांना माहिती द्या. तुम्ही जास्त दिवस घराबाहेर जात असाल तर पोलिसांना कळवा. पोलिस आणि नागरिकांमध्ये विश्वास हवा.
  2. घरातील सीसीटीव्ही तुमच्या फोनला जोडा. 
  3. घराच्या सर्व ठिकाणांचे कुलूप मजबूत असावे
  4. तुम्ही घरी नसताना घरात रोख रक्कम आणि दागिने ठेवू नका.
  5. तुमच्या घराबाहेर पडलेली वर्तमानपत्रे, दुधाची पाकिटे, जुनी रांगोळी आदींवर चोरांची नजर असते. म्हणूनच तुम्ही बाहेर जात असाल, या वस्तू आधीच बंद करा. 
  6. घरात दागिने न ठेवता ते फक्त बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी