[VIDEO] Asaduddin Owaisi: असादुद्दीन ओवैसी अयोध्या निकालावर वेगळी प्रतिक्रिया 

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 09, 2019 | 16:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Asaduddin Owaisi reaction on Ayodhya: असादुद्दीन ओवैसी यांनी अयोध्या प्रकरणी आलेल्या निकालावर असामाधानी व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टाने सुप्रीम आहे पण इनफॉलीबल (अचूक/अमोघ) नाही आहे. 

asaduddin owaisi statement on ram mandir babri masjid final decision says sc is not infallible news in marathi google newsstand
असादुद्दीन ओवैसी अयोध्या निकालावर वेगळी प्रतिक्रिया   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली :  ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असादुद्दीन ओवैसीने अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. या निकालावर त्यांनी असमाधान व्यक्त केले.  

त्यांनी मीडियासमोर येऊन वक्तव्य देण्यापूर्वी ट्विटरवर आपली भावना व्यक्त केली. तसेच एका पुस्तकाचा फोटोही शेअर केला. ओवैसी यांनी म्हटले की जस्टीस जे. एस. वर्मा यांनी सांगितले की सुप्रीम कोर्ट - सुप्रीम आहे पण इनफॉलीबल (अचूक/अमोघ) नाही. 

 

ओवैसी यांनी म्हटले की मला शंका वाटते की देश 'हिंदू राष्ट्रा'च्या रस्त्यावर चालला आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित म्हटले की जर बाबरी मशीदीचा ढांचा पाडला गेला नसता तर या प्रकरणी का निर्णय दिला असता.  अयोध्या राममंदीर असो वा एनआरसी भाजप या सर्व मुद्द्यांचा वापर करणार आहे. मुस्लीम भले गरीब आणि कमजोर असतील पण त्यांना खैरात म्हणून मशीदीची ५ एकर जमी नाही पाहिजे. मी हैदराबादमध्ये भीक जरी मागितली तरी अयोध्येत मशीदीसाठी एक रक्कम सहज  जमा करू शकतो. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...